
ग्राम गुदमा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा व वीरांगना राणी दुर्गावती जयंती साजरी
गोंदिया :गुदमा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा व वीरांगना राणी दुर्गावती जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे गुण अंगीकारून प्रगती साध्य करावी असे आवाहन उपस्थितांना केले. सोबतच त्यांनी प्रत्येक महिलेला विरांगणा राणी दुर्गावती आपल्या आयुष्यात आदर्श मानून पुरुष प्रधान समाजात आपले स्थान निर्माण करण्याची आवाहन केले. बिरसा मुंडा भारतीय आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश नियंत्रणाविरुद्ध लढा दिला. ते एक दूरदर्शी होते, त्यांनी आपल्या जमातीच्या लोकांच्या मुक्तीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जे नियमितपणे ब्रिटीशांच्या गुन्ह्यांचे आणि शोषणाचे बळी होते. त्यांनी आदिवासी समाजात जनजागृती केली.
दरम्यान गुदमा येथे विविध विकास कार्याचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यात १० लक्ष रुपये खर्च करून क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आणि महाराणी दुर्गावती स्मारक परिसराचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर चावडी बाधकामाचे लोकार्पण देखील करण्यात आले. ग्राम गुदमा येथील शेकडो नागरिकांनी जनसेवेचा संकल्प घेत जनता की पार्टी (चाबी संघटन) मधे प्रवेश घेतला. सर्वाना दुपट्टा घालून आमदार विनोद अग्रवाल यांनी सर्वांचे स्वागत केले.
आदिवासी राणी दुर्गावती महिला समिती गुदमा च्या दुर्गाताई सिंद्रामे (अध्यक्ष), शारदाताई पंधरे (उपाध्यक्ष), गुणवंता बाई धुर्वे (सचिव), धनवंता पंधरे, खेलनबाई पुसाम, धूरपता पंधरे, पालिकताई धुर्वे, निर्मला धुर्वे, कमलाबाई पंधरे, जसवंता धुर्वे, शाबुदा उईके, लता टेकाम, धनलाता धुर्वे, परबत बाई मडावी, नशाबाई सय्याम, शारदा उईके, चंद्रकला धुर्वे, सत्यशीला धुर्वे, अंजुबाई पंधरे, धनवंता धुर्वे, कल्पना धुर्वे, शशिकला धुर्वे, खोमेश्वरी पंधरे, अनिता पंधरे, निर्मला मडावी, जीवनकला धुर्वे, जयवंता उइके, सरिता उईके, चंपाबाई उईके, मीताबाई धुर्वे, अमृताबाई पंधरे, रागनबाई पंधरे, योगेश्वरी पंधरे, लक्ष्मी पंधरे, निर्मला मारकाम, रत्नमाला धुर्वे, योगिता पंधरे, कविता धुर्वे, किसना धुर्वे, संजूताई पंधरे, हिरदा उइके, निर्मला उईके, शामकाला पंधरे, अनुसाया पंधरे, भूमिता धुर्वे, रामनबाई धुर्वे, खेलनबाई धुर्वे, कांताबाई धुर्वे, सांगितला टेकाम, राजेश्वरी पंधरे, प्रियांका पंधरे, आदिवासी पुरुष बिरससा मुंडा समिती गुदमा चे राजू धुर्वे (अध्यक्ष), रामेश्वर मरकाम (उपाध्यक्ष), ईश्वरदास पंधरे, दिलीप पंधरे, अनिल उईके, लखन धुर्वे, अमित पंधरे, विजय धुर्वे, राजेंद्र पंधरे, कुवरलाल उईके, राजकुमार पंधरे, मनोज मडावी, संजय पंधरे, श्रीराम सिंद्रामे, कलमसिंह धुर्वे, लालचंद पंधरे, विनोद मडावी, गुरविंद धुर्वे, नितेश उईके, महेंद्र पंधरे, गणेश पंधरे, केवल धुर्वे, भोजराज उईके, बकाराम पंधरे, भवनसिंग धुर्वे, दिनेश पंधरे, अनिल धुर्वे, अनिल धुर्वे, रणजित पंधरे, अनमोल धुर्वे, प्रविण धुर्वे, भोजराज धुर्वे, दिनेश टेकाम, अशोक पंधरे, दिलीप पंधरे, ओमकार पंधरे, सुकचंद टेकाम, निलेश उईके, तुकाराम पंधरे, गणपत उईके, भोजराज धुर्वे, रामप्रसाद उईके, नरेंद्र पंधरे यांचा समावेश आहे.