प्रबोधन व्याख्यानमाला रंगली,
१०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
निबंध व गीतगायन स्पर्धा बक्षीस वितरण
अर्जुनी मोर :जवळच्या येरंडी येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला १४८ वी बिरसा मुंडा जयंती व भारताचे संविधान गौरव दिन यांचा संयुक्त समारोह मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. गावकरी नागरिकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला.यावेळी कार्यक्रमाला पोलीस ठाण्यात नवेगावबांधचे पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख वक्ते वंचित बहुजन आघाडी प्रभारी भगवान भोंडे भंडारा, तुमसरच्या प्रबोधनकार सरयू डहाट, के. एस. बक्षी अर्जुनी मोरगाव, संचित वाढवे अर्जुनी मोरगाव, प्रा. एस. एस. शाहारे अर्जुनी मोरगाव प्रमुख पाहुणे- वनरक्षक सुरेश रामटेके पुराडा, बोंडगावदेवीचे भाग्यवान फुल्लूके, प्रभाकर दहिकर, पोलीस पाटील खेमराज गेडाम, धम्मदीप मेश्राम, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी अश्विन डोंगरे, के ए रंगारी नवेगावबांध, प्रकाश नंदागवळी, शशिकुमार तागडे, कृपाल बोरकर, शिल्पा जनबंधू, अमोल भोसले, विद्या गेडाम गुणवंता बोरकर स्मिता तागडे पितांबर वाघाडे यशवंत बोरकर, बी बी कांबळे, रतिराम नंदागवळी, राजन खोब्रागडे, सुरेश खोब्रागडे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील वैद्यकीय पथक यांनी बिपि सुगर ताप खाशी डोके दुखी अशी आरोग्य तपासणी व औषधोपचार १०० नागरिकांची करण्यात आली. डॉ अंबर मडावी व चमू यांनी पार पाडली.कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.
यावेळी विचार मंचावरील पाहूण्यांनी संविधान दिन व आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच भीमगीत व आदिवासी गीत अशी गीत गायन स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. निबंध स्पर्धा यामध्ये १५ स्पर्धक सहभागी झाले होते. रांगोळी स्पर्धा ६ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेकांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन कमलेश ब्राम्हणकर यांनी करून, प्रास्ताविक कैलास इस्कापे यांनी मांडले तर आभार रोशन मसराम यांनी मानले.
यशस्वी करण्यासाठी प्रशांत तागडे, गुलाब वाघाडे, मिथुन तागडे, हनवत तागडे, कामिना कन्नाके, सुरज रंगारी, रोहित रामटेके, संदीप नंदागवळी, संदीप पंधरे, चेतन राऊत, लता गेडाम, नंदकुमार कांबळे, युवराज बोरकर, नितेश कुंभरे, सचिन कांबळे, संजय गणविर, गुरुदेव बोरकर, गौरव गेडाम, जस्वीन बोरकर, सचिन वाघाडे, सुभाष वाघाडे, विठ्ठल तागडे संविधान गौरव दिन समिती पदाधिकारी व समर्थकांनी सहकार्य केले.