इसापूर ग्रामपंचायत सरपंचपदी दीक्षा लांजेवार तर उपसरपंच म्हणून दिलीप सोनवणे कायम

0
17

अर्जुनी मोर -तालुक्यातील गट ग्रामपंचायत इसापूर येथे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ईश्वर चिठ्ठीने सौ दीक्षा संतोष लांजेवार या विजयी झाल्या. विशेष म्हणजे ही निवडणूक 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार होती. सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचातमध्ये कल्पना शिवकुमार करंबे यांनी अडीच वर्ष सरपंच पदाचा कार्यभार पाहिला. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला त्यांचा राजीनामा संमत झाल्यानंतर निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला. ग्रामपंचायत सदस्य आनंदराव सोनवणे हे दवाखान्यात भरती असल्याकारणाने निवडणूक सभेला हजर राहू शकले नाही. सरपंच पदासाठी दीक्षा संतोष लांजेवार व सरस्वतः मोरेश्वर वलथरे यांनी सरपंच पदाची दावेदारी दाखल केली होती. दोघांनाही अखेर तीन-तीन अशी समान मते पडल्याने सार्थक जयंत गोंडाने या बालकाच्या हातून ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. त्यामध्ये दीक्षा संतोष लांजेवार ह्या सरपंच पदी विराजमान झाल्या. तर उपसरपंच म्हणून दिलीप नामदेव सोनवाने हे कायम आहे. तर सदस्य म्हणून सौ नलिनी चांदेवार, मच्छिंद्र गोंडाने, सौ सरस्वती वलथरे, आनंदराव सोनवणे, सौ कल्पना करंबे सदस्य ग्रामपंचायत असून नवनियुक्त सरपंच सौ दीक्षा लांजेवार यांनी गाव विकासासाठी सदैव तत्पर राहू असे याप्रसंगी सांगितले.या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्याक्षी अधिकारी म्हणून एम. टी. मल्लेवार, तलाठी विजय निमकर, ग्रामसेवक समीर रामटेके यांनी काम पाहिले.