वाशिम, दि. 01 : आज १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय, वाशिमच्या वतीने शहरातून एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. व्ही. के. टेकवाणी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्री. खेडकर, वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. बालाजी हरण, क्षयरोग अधिकारी डॉ.परभणीकर, मेट्रन श्रीमती चव्हाण, श्रीमती हजारे, श्रीमती खंडारे व जिल्हा पर्यवेक्षक रवी भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“आता नेतृत्व व आघाडी समुदायांची वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने “या घोषवाक्याने शहर दुमदुमून गेले. रॅलीचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयातून करण्यात आला. शहरातील मुख्य चौकामधून बसस्थानकमार्गे, जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्ये व गीताचे सादरीकरण केले. यावेळी माहितीचे हस्तपत्रक व एचआयव्ही प्रतिबंधक निरोध वाटप करण्यात आले. लोककलेच्या माध्यमातून शाहीर प्रज्ञानंद भगत आणि पार्टी यांनी पथनाट्य सादर केले. रॅलीमध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या रॅलीमध्ये श्री बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी विभाग, श्री. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले महाविद्यालय, श्री. शिवाजी विद्यालय आणि महाविद्यालय, सावित्रीबाई फुले महाविद्यालय, नर्सिंग, मॉ. गंगा नर्सिंग स्कूल, नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज, मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालय, राजर्षी शाहू महाराज नर्सिंग महाविद्यालय, स्काऊट गाईड विभाग, मालतीबाई सरनाईक विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, राजश्री शाहू महाराज विद्यालय, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, श्री गुणवंत शिक्षण संस्था, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्था, विहान प्रकल्प वाशिम, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरण, आकाशवाणी विभाग आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे उत्तम सहकार्य लाभले.
रॅलीचा समारोप जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक पंढरी देवळे यांनी तर आभार जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पर्यवेक्षक रवी भिसे, मिलिंद घुगे, डी. आर. मनोहर, श्री. रत्नपारखी, अनिल राठोड, निलेश अल्लाडा, श्रीमती आगाशे ,श्रीमती अवचार, श्रीमती वानखेडे, श्री. मेसरे, दिशा वरीद, बाबाराव भगत, श्री. गायकवाड, चंद्रशेखर भगत, रुपेश भगत, देवानंद जाधव, पंकज खंडारे तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीसुद्धा अथक परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाने रॅलीच्या मार्गाचे उत्तम नियोजन केले व मोलाचे सहकार्य केले. पत्रकार बांधव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.