बिरसी विमानतळावरुन तिरुपतीकरीता इंडिगोच्या पहिल्या प्रवासी विमानाने घेतली झेप

0
24

गोंदिया,दि.01-गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावर प्रदिर्घ कालावधीनंतर आज 1 डिसेंबरला गोंंदियाच्या बिरसी विमानतळावर इंडिगो कंपनीच्या प्रवासी विमानाचे 40 प्रवाश्यासह आगमन झाले.तर गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन हैद्राबाद तिरुपती करीता इंडिगोच्या विमानाने पहिले उड्डाण 12.55 मिनिटाने घेतले. याविमानात गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक लंजे यांच्यासह 55 प्रवाशांनी प्रवास केला.उड्डाणाच्या शुभारंभप्रसंगी माजी विमान वाहतूक मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी आज ही सेवा सुरु होत आहे,ती टिकवून ठेवण्याकरीता आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले तर भविष्यात गोंंदिया मुंबई सरळ विमानसेवा इंडिगोच्यावतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.सोबतच मध्यप्रदेश व शेजारील जिल्ह्यातील व्यापारी,अधिकारी व व्यवसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.मध्यप्रदेशातील कान्हा केसरी व्याघ्रप्रकल्पाकरीता व नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाकरीता हे विमानतळ जवळचे असल्याने देशातील व विदेशातील पर्यटकांनाही लाभ होणार असल्याचे म्हणाले.गोंदिया हैद्राबाद तिरुपती विमानाला खासदार प्रफुल पटेल,खासदार सुनिल मेंढे,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,आमदार विनोद अग्रवाल,जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्यासह अनेकांनी गोंदिया हैद्राबाद तिरुपती विमानसेवेला हिरवी झेंडी दाखवत रवाना केले.