संविधानामुळेच देशाला जगात सन्मान मिळाला:– चंद्रशेखर ठवरे

0
26

अर्जुनी मोर. :– स्वातंत्र्यपूर्वी आपण विखुरलेले होतो विविध वतने राजांची स्वतंत्र राज्य आप आपले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नव्हते परंतु 26 नोव्हेंबर 1949 ला देशात संविधान लागू झाले आणि तेव्हापासून आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटतील तिथे निर्णय घेण्यास स्वतंत्र झालो.देशाच्या राष्ट्रीय संपत्तीवर सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाला. संविधानामुळेच सर्व जाती धर्मांना संविधानाच्या पवित्र बंधनात सुरक्षित राहण्याचे बळ मिळाले. त्यामुळेच भारत देशाला जगात सन्मान मिळाला असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर ठवरे यांनी केले आहे.
तालुक्यातील अरततोंडी/ परसटोला येथे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन चंद्रशेखर ठवरे बोलत होते.सामाजिक परिवर्तन संघटना अरततोंडी च्या वतीने ता.26 आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे होते.विशेष मार्गदर्शक म्हणुन डॉक्टर अमोल शेंडे, टीना कराडे, तर प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संजय कांबळे ,ब्रह्मनायक सर, सुरेश रामटेके, संजय रामटेके, शांताबाई लोथे, चंद्रशेखर रामटेके, नामदेव मडावी, ईश्वर मेश्राम ,करुणा कराळे ,सुरेखा टेंभुर्णे अस्मिता आडे, रसिका लंजे, वंदना मेश्राम, पुष्पा कराडे, छाया कावळे, शिल्पा रामटेके, संध्या लोथे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे ,डॉक्टर अमोल शेंडे, टीना कराडे यांनीही संविधानावर विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात गावात प्रभात फेरीने करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मनीषा शहारे संचालन अलका मडावी तर आभार करुणा कराळे यांनी केले. संविधान गौरव दिन कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.