गोरेगाव,दि.०३- तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे आज दिनांक ०३ जानेवारीला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्राम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष जे.जे.पटले, ग्रांम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले, माजी उपसरपंच श्रीराम पारधी, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे, सदस्य हिरालाल महाजन, देवदास चेचाने, प्रमानंद तिरेले, मुकेश येरखडे, हिरामण पटले,तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले. शिवराम मोहनकार, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे,आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करणार्या आद्द शिक्षिका,समाजसेविका आणि सत्यशोधक समाजाच्या एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गुणगौरव म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात ३ जानेवारी हा दिवस ‘ बालिका दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने ३ जानेवारी हा दिवस १९५५ पासून बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. आता स्त्रिया केवळ चुल आणि मुल इतक्याच चौकटीत अडवून न राहता बाहेर पडुन काम करू लागल्याने त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी बालिका दिनाचे विशेष महत्त्व आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला सावित्रीबाई यांचा विवाह लहानपणीच म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासी झाले असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व प्रस्थाविक संस्थेचे सदस्य वाय.एफ.पटले तर आभार प्रवीण ठाकूर यांनी केले.यावेळी कार्यक्रमात वाचक व गांवातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.