गोंदिया,दि.03- गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचलित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जयंत महाखोडे प्रामुख्याने उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
प्रा. धरमवीर चौहान, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांनी सावित्रीबाईंना अभिवादन करताना सांगितले की सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासोबतच विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यांसारखी महत्वाची कार्ये सुद्धा केली. तसेच एम. एस्सी. प्रथम वर्षीय विद्यार्थिनी कु. नेहा लांजेवार ने सावित्रीबाईंच्या जीवनाशी निगडित घटनांविषयी उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्नेहा जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.मनोज पटले आणि श्री. प्रफुल्ल वालदे यांचे सहकार्य लाभले.