मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

0
9

गोरेगाव- मुलींच्या शिक्षणासाठी आपले अखंड आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवनाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती आमच्या मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्या सौं. सी. पी. मेश्राम उपस्थित होते. तसेच शाळेचे संस्था सचिव आर.डी.कटरे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले, पर्यवेक्षिका कु. एस. डी. चिचामे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्री वादाची जननी मानले जाते सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवयित्री होती. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाच्या कार्याची जाणीव आपल्या मार्गदर्शनातून विध्यार्थ्यांना करून दिली..

कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ग पाचवी च्या विध्यार्थ्यांनाकडून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नृत्य सादर केले तसेच वर्ग सातवी च्या विध्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी ह्यावेळी आपले मनोगत, भाषणं आणि गीते सादर करत आपल्या देशातील पहिली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महिला वकील, पहिली आदिवासी महिला मुख्यमंत्री, डॉक्टर, पायलट, महिला सीपाई, अशप्रकारच्या अनेक वेशभूशेत विध्यार्थी उपस्थित होते..

कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वर्ग दहावी वी चे विध्यार्थी उत्सव लांजेवार व ओम तूरकर तसेच आभारप्रदर्शन वर्ग नववी ची विद्यार्थिनी कु. निधी कटरे हिने केले.