स्वामी विवेकानंद विद्यालय कारंजाच्या स्नेहसमेंलनाचे उदघाटन

0
26

गोंदिया,दि.04-तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय कारंजा येथे 3,4,5,6 जानेवारी 2024 या चार दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सरपंच नोकचंद कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.बी.पटले होते.तर प्रमुख अतिथी म्हणून टेकचंदजी बलभद्रे सचिव अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजा,ओमेन्द्र उपराडे सदस्य प.स. कारंजा ,सौ.शालिनीताई कापसे अध्यक्ष शा.व्य.स.कारंजा,कन्हैयाजी राहमतकर सदस्य ग्रा.प.कारंजा,मनोहरजी बघेले सदस्य ग्रा.प.कारंजा,सौ ललिताताई वाघाडे सदस्य ग्रा.प.कारंजा,सौ.गुणवंताबाई चुलपार सदस्य ग्रा.प.कारंजा,प्रभाबाई कोठवार सदस्य ग्रा.प.कारंजा,सौ.शकुन गराडे ,सौ.मनीषा ढोमने,सौ.मंगलाताई रणदिवे माजी सरपंच कारंजा,श्रीमती लिलाबाई यादव,सौ.जशोदाबाई पंधराम,कु.एस.एल.तुरकर,कु..आर.चौधरी,डी.एन.रामटेके,एम.आर.बलभद्रे,जी.बी.बोपचे,श्रीमती बी.डी.बघेले,श्रीमती गीताबाई बडगे,तसेच सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करकण्यात आली.संचालन व आभार डी.एन.रामटेके यांनी केले.