केशोरी पोलीस स्टेशनचे “गाव तेथे ग्रंथालय” उपक्रम
अर्जुनी मोर.-प्रत्येक गावात स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करावे, गावा गावातून अधिकारी निर्माण व्हावे, तरुण-तरुणींना शासकीय नोकरी अभ्यासाकरिता एक व्यासपीठ निर्माण व्हावे या संकल्पनेतून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी “गाव तेथे ग्रंथालय” हा नविन उपक्रम सुरू करून केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावांमध्ये नविन स्पर्धा परिक्षा वाचनालय उघडण्याचे ठरविले.
या संकल्पनेनुसार दि.०३/०१/२०२४ रोजी गोठणगाव व वडेगाव बंद्या येथे अपर पोलीस अधिक्षक गोदिया नित्यानंद झा यांच्या हस्ते नविन स्पर्धा परिक्षा वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
सदर उद्घाटन सोहळयाला विशेष अतिथी म्हणून अनिरुद्ध कांबळे तहसीलदार अर्जुनी मोर., सुहास खरे अध्यक्ष माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर व त्यांचे सर्व सदस्य, संजय ईश्वार सरपंच गोठणगाव, घनश्याम शहारे सरपंच वडेगाव बंध्या, सपोनि सचिन घाटे, सपोनी आनंदराव घाडगे देवरी, पोउपनि प्रताप बाजड, माऊली मित्र मंडळ नागपूरचे सर्व पदाधिकारी, गावातील मान्यवर मंडळी, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते.या दोन्ही वाचनालयांच्या निर्मितीसाठी पोलीस स्टेशन केशोरीचे सर्व अधिकारी/अंमलदार, गोठणगाव व वडेगाव बंद्या ग्रामपंचायत पदाधिकारी/कर्मचारी, माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सर्व सदस्य यांनी खूप परिश्रम घेतले.
या दोन्ही स्पर्धा परिक्षा वाचनालयांची निर्मिती निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया, नित्यानंद झा अपर पोलीस अधिक्षक.गोंदिया, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सोमनाथ कदम, पोउपनि प्रताप बाजड पोहवा. शिवदास निकोडे , प्रेमदास होळी, विलास राऊत, प्रल्हाद देव्हारे, सुशिल रामटेके, राहुल चिचमलकर, नितीन डुंभरे, रामेश्वर मेश्राम, मपोहवा हरिणखेडे व सर्व अंमलदार यांनी केलेली आहे.