मुलींनी शिक्षणाच्या बळावर विविध पदे भूषवावीत-सुरेखा कांबळे

0
2

धाराशिव-मुलींनी शिक्षणाच्या बळावर विविध पदे भूषवावीत, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून मुलींनी उच्च शिक्षण घेऊन पायलट, डॉक्टर, कलेक्टर, तहसीलदार, वकील व इंजिनीयर बनले पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सुरेखा कांबळे यांनी केले.
शिंगोली आश्रम शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी मुख्याध्यापिका सुरेखा कांबळे होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शिक्षिका ज्योती राठोड, ज्योती साने, वैशाली शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेखा कांबळे बोलत होत्या. यावेळी राठोड ज्योती, सतीश कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शेख अब्बास अली, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, चित्तरंजन राठोड, प्रशांत राठोड, सचिन राठोड, मदन कुमार आमदापुरे, संजीव कुमार मस्के व कर्मचारी गोविंद बनसोडे, मस्के भिकाजी, सचिन माळी, वसंत भिसे, रेवा चव्हाण, अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील रत्नाकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विशाल राठोड यांनी मानले.