मुंडीपार येथे श्रीराम मुर्ती प्रदान सोहळा

0
28

गोरेगाव,दि.13ः-अनुलोम संस्थेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुुक्यातील मुंडीपार येथे वस्तीमित्र राजेशकुमार हेमराज चौधरी यांच्या निवासस्थानी श्रीराम मुर्ती प्रदान सोहळा‌ पार पडला.अयोध्येतील कोदंडधारी भगवान श्रीराम मूर्ती वस्ती मित्र राजेशकुमार चौधरी यांना अनुलोमचे भाग जनसेवक जयवंत डोये व वस्तीतील वरिष्ठांच्या हातून भेट प्रदान आली.श्रीराम मूर्तीचे पूजन करुन आरती करण्यात आली व श्रीरामांचा जयघोष करण्यात आला.भजन मंडळाच्या माध्यमातून गावातुन शोभायात्रा काढण्यात आली.जयवंत डोये यांनी प्रास्ताविक केले.सदर कार्यक्रमाला हेमराज चौधरी,धाडुजी बिसेन,के.आर.माहुरे,गोबरी चौधरी,के.एन.कटरे,खेवराम डाहाके,धृवराज बिसेन,उमेंद्र ठाकुर, मोरेश्वर चौधरी,होमराज राहांगडाले,हेतराम राहांगडाले व वस्तीतील भाविक भक्तगण नागरिक, महिलाभगिनी तथा बालगोपाल्लांची उपस्थिती होती.श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा व देवेंद्र फडणवीस यांचे पत्राचे वाचन करून प्रसाद वितरण करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.