नवेझरी येथे संक्रांतीनिमित्त सफाई अभियान

0
8

तिरोडा- गुरुदेव भंजन मंडळ व सर्यादय क्रीडा मंडळ तसेच काही युवक यांनी मंकरसंक्रात च्या पावनपर्वावर ग्रांममंडळ नवेझरी येथे हनुमानमंदिरात रात्री भजन करण्यात आले .तसेच स्थानिक मोक्षधाम परीसरातील सकाळी वर्षा नु वर्षे चालत आलेले साफसफाई अभियानाला पहाटे पाच वाजे पासुन सुरुवात करण्यात आली. महाशिवरात्री पर्यंत दररोज पहाटे साफसफाई करण्याचा संकल्प करुन साफसफाई अभियान सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरीकासाठी विरंगुळा व बसण्याची व्यवस्था करण्याचा विचार करण्यात आला. लवकरच जेष्ठ नागरीकाचा मानसन्मान करण्याचे आवाहन करण्यासाठी जनजागृती करण्यात येईल. साफसफाई करण्यासाठी महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हा अध्यक्ष, हरीरामजी शेन्डे, गोपाळ शेन्डे, रतन खुळसिगे, रवि भांडारकर, बाबुराव शेन्डे, कमल सोनटक्के, अनिल शेन्डे, अभय नांदगावे, समिर मेश्राम, सुनिल सोयाम, सहादेव उके, ऊरकुडा उके, राकेश उके रोजनदारी कर्मचारी सिद्धार्थ इनवाते, आर्यन मेश्राम व शासकीय रुग्णालयात अधिकारी असलेले व सुट्टी वर आलेले डॉ दिपक योगिराज राहागडाले यांनी सुद्धा सफाई अभियानास सहकार्य केले.