निसर्ग मित्रांनी दिले घुबडला जीवनदान

0
5

तिरोडा : शहरात गांधी वार्डातील जूने बगीचा जवळ रोडवर कुत्र्यांची झुंड हे एका घुबडला मारत होते. त्या कुत्र्याच्या झुंड मधून घुबडला वाचवुन वन परिक्षेत्र कार्यालय तिरोडा यांच्या ताब्यात दिले.
निसर्ग मित्र म्हणून अनेक वर्षापासून वन प्राण्यांचे रक्षण करण्याचे काम हे एवरग्रीन सोशल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. तरी शहरात गांधी वाडातील जुने बगीचा परिसरात काही कुत्र्ये मिळून एका घुबडला मारत होते. हे माहीती मिळताच एवररग्रीन सोशल असोसिएशनचे सदस्य आलोक तरारे यांनी त्वरित सर्व कुत्र्यांणा तिथून पळविले. तसेच घुबडला वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा यांना संपर्क साधून त्यांच्या सोबत सर्व संस्थेचे सदस्य व वन कार्यालयाचे कर्मचारी यांनी घुबडाला जंगलात नेऊन सोडले.व शहरातील सर्व नागरिकांना वन्य प्राण्यांचे रक्षण करा असे आवाहन केले.