गोंदिया,दि.16ः तालुक्यातील जि.प. भारतीय विद्यालय एकोडीच्या सभागृहात गोंदिया जिल्हा लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया ) ची सभा जं.का.से.स.संस्था पुणेचे कार्यकारी संचालक राजेश कटरे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.या सभेत लोककला मंडळाची जिल्हा व तालुका कार्यकारीणी गठित करण्यात आली.यावेळी माजी सरपंच रविकुमार पटले,पंचायत समिती सदस्य अजाबराव रिनायात,उमेश भांडारकर, माजी उपसरपंच किरण मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. लोककला सेवा मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकून मंडळाच्या कार्याला समोर नेण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे याविषयी विस्तृत अशी माहिती लोककला सेवा मंडळाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष संजय कटरे यांनी दिली. महिला अध्यक्ष सौं लीलावती रहांगडाले यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सभेला 110 कलावंतांनी उपस्थिती दर्शविली. सूत्रसंचालन गोंदिया जिल्हा महासचिव संजय पारधी यांनी केले.आभार निताताई पटले यांनी मानले.
या बैठकीत जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली,त्यामध्ये झेड.डी.पटले उपाध्यक्ष,निताताई पटले महिला उपाध्यक्ष,बी.यु.बिसेन प्रसिद्धी प्रमुख तर गोंदिया तालुका अध्यक्ष जगदीश पटले, वीरेंद्र चन्ने महासचिव,हेतराम सोनेवाने – उपाध्यक्ष,छन्नू चौधरी – उपाध्यक्ष,माणिक चौधरी – उपाध्यक्ष,किरण मेश्राम प्रसिद्धी प्रमुख,रामदयाल बघेले – सहसचिव,श्रीमती श्यामवती परिहार महिला अध्यक्ष,माया पारधी महिला उपाध्यक्ष,श्रीमती बिरजबाई मेश्राम – महिला उपाध्यक्ष,आरती पटले – महिला सहसचिव,उषाताई मेश्राम महिला सहसचिव,सविता रहांगडाले – महिला उपाध्यक्ष यांचा समावेश आहे.तिरोडा तालुका अध्यक्ष जे.आर.पटले,प्रल्हाद ठाकरे महासचिव,झनक रहांगडाले उपाध्यक्ष,धर्मेंद्र बोपचे उपाध्यक्ष,दौलतसिंह हरिनखेडे कोषाध्यक्ष,जयप्रकाश बिसेन सहसचिव यांची निवड करण्यात आली.