जि.प.सदस्या रचना गहाणे यांचे पाठपुराव्याला यश
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या इटियाडोह धरणावर तयार करण्यात आलेल्या झासीनगर उपसा सिंचन योजनेचे मागील 27 वर्षाच्या दिर्घ कालावधीनंतर 15 जानेवारी रोजी दुसरा पंप सुरू करण्याची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे झासीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी दुसऱ्यांदा नवेगावबांध जलाशयात पडले. यासाठी नवेगावबांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी ही योजना लवकरात लवकर सुरू करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करीत असल्याने हळूहळू ही योजना कार्यान्वित होताना दिसत आहे.
झासीनगर उपसा सिंचन योजना त्वरित कार्यान्वित व्हावी म्हणून तत्कालीन मंत्री राजकुमार बडोले यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र यंत्रणेचे काम कासव गतीने सुरू असल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 27 वर्षापासून ही योजना रेंगाळत पडली आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी म्हणून नवेगाव बांध क्षेत्राच्या जिल्हा परिसद सदस्य रचना गहाणे यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी त्यांनी जिल्हास्तरीय समिती सुद्धा गठीत केली होती. अखेर रचना गहाणे यांच्या पाठपुरावाला यश येऊन मागील 29 मे 2023 रोजी झासी नगर उपसा सिंचन योजनेचे पाणी पहिल्या पंपाद्वारे नवेगाव बांध जलाशयात सोडण्यात आल्याची चाचणी यशस्वी झाली होती. पहिल्या चाचणीच्या वेळेस झाशिनगर उपसा सिंचन योजने जवळून नवेगाव बांध पर्यंत जाणारा कालवा काही ठिकाणी फुटलेला होता. त्यामुळे त्या कालव्यांची दुरुस्ती करून 15 जानेवारी ला दुसरा पंप सुरू करून नवेगाव बांध जलाशयात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यानंतर तिसरी पीजी चाचणी करणे आहे. ही चाचणी सुद्धा 15 ते 20 दिवसात करू असा विश्वास रचना गहाणे यांनी व्यक्त केला. हळूहळू का होईना रचना गहाणे यांच्या पाठपुराव्यामुळे झासीनगर उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळाल्याचे दिसत आहे. दुसऱ्या पंपाची चाचणी सुरू असताना या ठिकाणी उपविभागीय अभियंता समीर बनसोडे, जिल्हा परिसद सदस्य रचना गहाणे, शाखा अभियंता वैरागडे व कंत्राटदार चौरागडे व इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
झाशिनगर उपसा सिंचन योजनेचा दुसरा पंप सुरु,नवेगावबांध जलाशयात पाणी पडले
वाढदिवसाच्या शुभेच्छा