गोंदिया:- युवा कोसरे कलार समाज संस्था, गोंदियाच्यावतीने 21 जानेवारीला गोंदियातील गोविंदपूर परिसरात स्थित साँई मंगलम् लाँन्स येथे कोसरे कलार समाज नववर्ष मिलन, उपवर-वधु परिचय व युवा सम्मेलन तथा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन मेळाव्यात मान्यवरांचे मार्गदर्शन , उपवर-वधू परिचय संमेलन , महिलांचे हळदी-कुँकु कार्यक्रमासह कोसरे कलार समाजातील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ईयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 85 टक्केच्या वर गुण तसेच पदवी व पदयुत्तर अभ्यासक्रमात प्राविण्य श्रेणी मिळविलेले विद्यार्थी , वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी तसेच शासकीय नोकरीसाठी आवश्यक केंद्र व राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षेमध्ये निवड झालेले विद्यार्थी , राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू यांचा पालकांसह सत्कार करण्यात येणार आहे. मेळावा भाऊराव उके (सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती,गोंदिया) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून मेळाव्याचे उद्घाटन खेमराज देसमुख (संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती,सडक/अर्जुनी) यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यात दिपप्रज्वलक म्हणून छबुताई महेश उके,जगदिश (बालू) बावनथडे (सदस्य, जि.प.सदस्य), विशेष अतिथी म्हणून केशवराव मानकर (आमगांव),रतिराम दरवडे (देवरी),श्याम चंदनकर,अशोक सहारे ,सुरेश मेश्राम (बंजारा) , गजानन पटले (नागपूर),घनश्याम मेश्राम (रायपूर),रामकृष्ण मेश्राम (लाखनी),डाँ.प्रमोद मेहेश्रे (नागपूर), विठ्ठलराव मेश्राम (चरोदा, भिलाई),सुरेशराव मेश्राम (अकोला),दिलीपराव सुर्यवंशी (अमरावती),नरेंद्र हो. शेंडे (नागपूर),धनराज उके (ओक),विनायकराव कावरे (यवतमाळ),सी.ए. राजेश सहारे,एँड. मुकेश पाटनकर,वसंतराव उईके (तळोधी/बाळापूर),बाळकृष्ण मांडवे (गडचिरोली),सुदाम सुरसाऊत,सर्वेश्वर मेश्राम , मुकेश शिवहरे,नरेंद्र धुवारे (बालाघाट),दिपक जायसवाल,डाँ.निरज आर. कटकवार,एँड.विरेंद्र जायसवाल,दुर्गाबाई गोपाल तिराले,जैपाल मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.