एन एम डी महाविद्यालयात जलजीवन मिशन वकृत्व स्पर्धा

0
12

तालुक्यातून 25 स्पर्धकांच्या सहभाग
वरिष्ठ व कनिष्ठ गटातून 6 स्पर्धकांची निवड
गोंदिया—-महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन, राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 17 जानेवारीला जलजीवन मिशन या विषयावर तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन एनएमडी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
जल जीवन मिशन भाषण स्पर्धेचे शुभारंभ गोंदिया शिक्षण संस्था सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शारदा महाजन यांच्या नेतृत्वात अर्थशास्त्र विभाग प्रमुख
डॉ अर्चना जैन यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती गोंदियाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री धुवाधपाळे, केन्द्र प्रमुख कृष्ण कुमार फ़ूने ,नमाद कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा रवींद्र रहांगडाले, गट साधन केंद्राच्या कु मंगला बडवाईक,कु शारदा जिपकाटे, कु कांचन मेश्राम जल जीवन विभाग पंचायत समिती गोंदिया,समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बबन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातून वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातून 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी मार्गदर्शन करताना डॉ अर्चना जैन म्हणाल्या वर्तमान काळात पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे पाण्याची टंचाई नेहमीच होत असून येणाऱ्या काळात पिण्यायोग्य पाणी पुरणार नाही याकरिता पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी श्री धुवाधपाळे म्हणाले की जलसंचयन व त्यांच्या योग्य वापर करण्याकरिता शासन विविध उपक्रम चालवीत असून या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणे व पाण्याच्या योग्य तो वापर करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विचार लोकांपुढे व शासनापर्यंत पोहोचविणे हे या स्पर्धेचे लक्ष आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत वरिष्ठ गटातून प्रथम निखिल बनसोड द्वितीय क्रमांक राहुल एल्ले तर स्वप्निल चंद्रिकापुरे यांनी तृतीय स्थान प्राप्त केले. तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या गटातून प्रथम स्थान कुमारी पूजा मेश्राम द्वितीय स्थान प्रणिता नागदेवे,नलिनी बोपचे यांनी तृतीय स्थान प्राप्त केले.

या स्पर्धेत पर्यवेक्षक म्हणून डॉ शशिकांत कडू,डॉ कपिल चव्हाण, प्रा बालपांडे,प्रा बावनकर,प्रा टेंबरे, डॉ रवींद्र तिडके,यांनी भूमिका पार पाडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बबन मेश्राम यांनी केले, सूत्रसंचालन डॉक्टर संजय जगणे यांनी केले तर आभार मंगला बडवाईक यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपेंद्र पटले , तेजप्रकाश फुंडे ,कु रोशनी गौतम, कु रीतीका मेश्राम, कु नलिनी बोपचे, कु रिद्धी मानकर,कु अक्षरा मिश्रा, प्रा उर्विल पटेल, प्रा गीता पटेल, प्रा प्रवीण टेंभेकर, प्रा चेतन मानकर , प्रा राजेस्वरी चोपकर,मुन्ना राणा यांनी अथक परिश्रम घेतले.