जैन कलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत : आ.विनोद अग्रवाल 

0
16
स्नेहमिलन व लोकार्पण सोहळा 
 गोंदिया : जैन कलार समाजाने नेहमीच सहकार्याची भावना ठेवून  वाटचाल केली आहे. समाजासाठी त्यागाची भावना ठेवत ज्या पुढार्‍यांनी समाज भवनासाठी जागा उपलब्ध केली, बांधकाम केले आणि विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमाने समाजापुढे आदर्श निर्माण केले. त्या सर्वांनी खर्‍या अर्थाने या वास्तूची स्थापना केली. आम्ही केवळ त्यावर कळस लावण्याचे कार्य करत आहोत, असे प्रतिपादन आ.विनोद अग्रवाल यांनी केले.
जैन कलार समाजाच्या वतीने स्नेहसंमेलन, महिला मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व लोकार्पण सोहळा २१ जानेवारी रोजी समाज भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना आ.अग्रवाल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष एल.यु.खोब्रागडे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आ.विनोद अग्रवाल यांच्या हस्त्े करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ नागपूरचे उपाध्यक्ष शशिकांत समर्थ, रविकांत हरडे, विनोद खानोरकर, विनोद खेडीकर, संजय खानोरकर, गणेश दुरूगकर, विनोद भांडारकर, पं.स.सदस्य शैलेजा सोनवाने, पुष्पलता दुरूगकर, भारतीय कलार समाजाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे, शालिकराम लिचडे,  शोभेलाल दहीकर, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे, काशिनाथ सोनवाने, मनोजर किरणापुरे, विजय ठवरे, प्राजक्ता रणदिवे, हर्षा आष्टीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात माता जैनादेवी व समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहु यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर पुष्पगुच्छ देऊन  मान्यवराचा स्वागत करण्यात आला. प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी केले. त्यांनी समाजाच्या सर्वागिण विकासासाठी योग्य अशी आर्थिक मदत मिळण्याकरीता जनप्रतिनिधी, मध्यवर्ती मंडळ नागपूर व समाज बांधवांना आवाहन केले. यानंतर खासदार मेंढे व आ.विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून समाज भवनाच्या बळकटीसाठी केलेल्या कामाचे लोकार्पण आमदाराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुकेश शिवहरे यांच्या समाजाला ५१ हजार रूपये दान देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन उमेश भांडारकर व आभार प्रदर्शन वरूण खंगार यांनी केले.
यशस्वीतेसाठी सुखराम हरडे, यशोधरा सोनवाने, विणा सोनवाने, धनपाल कावळे, संजय मुरकुटे, मनोज भांडारकर, श्याम लिचडे, अतुल खोब्रागडे, अनिल मुरकुटे, उल्हास सोनवाने, सीमा ईटानकर, राजकुमार पेशने, सचिन पालांदूरकर, प्रितेश रामटेककर, देवानंद भांडारकर, वशिष्ट खोब्रागडे, रोशन दहीकर, गोपाल हजारे, उमेश हजारे, दिपक रेवतकर, शिवानी सोनवाने, बालु सोनवाने, पंकज तिडके, डॉ.लोकेश चिर्वतकर, योगेश ईटानकर, मंगेश रहमतकर, ज्योती किरणापुरे, वर्षा तिडके, गिता दहीकर, मिनाक्षी रहमतकर, उषा मोरघडै, वत्सला पांलादूरकर, पदमा भदाडै, सुमन तिडके, रविकांता ईटानकर, अर्चना सोनवाने, ललिता हलमारे, संगीता बडवाईक, लता पेशने, मधुकर दहीकर, दौलत मोरघडे, राहुल ईटानकर, ओमप्रकाश भांडारकर, सुशिल ठवरे आदिंनी परिश्रम घेतले.
………………..
महिला मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जैन कलार समाजाच्या वतीने महिला मेळावा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीतील वेदिका दहीकर, सरयू डोंगरे, पारस रहमतकर तर इयत्ता बारावीतील श्रावणी मोरघडे, कांचन मदारकर, सबुरी क्षिरसागर यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान महिला मेळावा आयोजित करून एकल नृत्य, सामुहिक नृत्य, नाटिका, उखाना स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत पुनम सोनवाने, रिमझिम किरणापुरे, नेहा खोब्रागडे, रेखा सोनवाने, वैष्णवी भांडारकर, आदर्श हरडे यांचा गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक म्हणून महेंद्र सोनवाने, भारती तिडके, ज्योती डाबरे यांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी हळदी-कुंकू व वाण वाटप केले.