Home विदर्भ लोकशाही दिन 5 फेब्रुवारीला

लोकशाही दिन 5 फेब्रुवारीला

0

गोंदिया, दि. 25 :  जिल्हयामध्ये सर्व सामान्य जनतेसाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. माहे फेब्रुवारी 2024 या महिन्यात पहिला सोमवार 05 फेब्रुवारी 2024 रोजी  सकाळी 11.00 वाजता लोकशाही दिन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

          लोकशाही दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांचे कडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागांचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देतील. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्य या कार्यक्रमात ज्या नागरीकांनी 15 दिवसापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनीच लोकशाही दिनात उपस्थित राहून आपल्या तक्रारी, अडचणी व गाणी सादर करावीत. याबाबत सर्व जनतेनी नोंद घ्यावी, असे आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी  स्मिता बेलपत्रे यांनी  केले आहे.

Exit mobile version