एके-४७ आणि काडतुसे सापडली

0
8

गडचिरोली, दिय11: येथील पोलिस मुख्यालय परिसरातील विशेष कृती दलाच्या एका जवानाची एके-४७ रायफल व काडतुसे दुसऱ्या एका शिपायाने वैयक्तिक वादातून लपवून ठेवल्याचे उघडकीस आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

विशेष कृती दलात कार्यरत पोलिस शिपाई श्री.हलामी यांच्याकडील एके ४७ ही रायफल व १२० काडतुसे ८ जूनच्या रात्री अचानक लंपास झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब लक्षात येताच एकच खळबळ माजली. त्यानंतर युद्धस्तरावर रायफल व काडतुसांचा शोध सुरु झाला. अखेर शुक्रवारला तपासादरम्यान विशेष कृती दलाचे कार्यालय असलेल्या पार्किंगच्या परिसरातच रायफल व काडतुसे लपवून ठेवल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान विशेष कृती दलात कार्यरत पोलिस शिपाई अतुल गोरले याने वैयक्तिक वादातून शिपाई श्री. हलामी यांच्या ताब्यातील शस्त्र व काडतुसे लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.