सनातन ही दहशतवादी संघटना – आशिष खेतान

0
13

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. ११ – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडेला झालेल्या अटकेनंतर आता गुप्तचर संस्थांनी दाभोलकरांच्या फरार मारेक-यांचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांची ट्विटरवरून केली आहे. तसेच ‘सनातन ही एक दहशतवादी संघटना असून हिंदू समाजावरील एक कलंक आहे’ अशी टीकाही खेतान यांनी केली.’सनातनने उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष लोकांची एक यादी बनवली असून त्यांचा काटा दूर करण्याचा कट आखला आहे. सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील एक बट्टा आहे. तावडेच्या अटकेमुळे याप्रकरणी न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणातील सीडी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात युपीए सरकार अपयशी ठरले’ असेही खेतान म्हणाले.