बोंडगावदेवी जि.प.क्षेत्रात ६२ लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भुमीपुजन

0
13

अर्जुनी मोर.-अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणा-या सिलेझरी, विहीरगाव, बोंडगाव देवी, चान्ना, इंजोरी, खांबी, दाभना येथे प्रस्तावित ६२ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.

यात २५१५ योजने अंतर्गत तसेच तांडावस्ती मुलभूत सुविधा अंतर्गत सिलेझरी गावातील २५ लक्ष रुपयांच्या निधीतून २ सिमेंट रस्ते, विहीरगाव गावातील ५ लक्ष रुपयांच्या निधीतून सभामंडपाचे, बोंडगाव देवी गावातील ५ लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ते, चान्ना येथे ९ लक्ष रुपयांच्या बौद्ध विहार सभागृहाचे, इंजोरी येथील ५ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यांचे, खांबी येथील ८ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यांचे तसेच दाभना येथील ५ लक्ष रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते तथा सदस्य लायकराम भेंडारकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय कापगते, पंचायत समिती सदस्य.संदिप कापगते, पंचायत समिती सदस्या कुंदाताई लोगडे, .जिवन लंजे, .व्यंकट खोब्रागडे, .लैलेश्वर शिवणकर, .दिपकर उके, सिलेझरी ग्रा.प.संरपच लताताई भेंडारकर, चान्ना ग्रा.प.संरपच सचिन डोंगरे, खांबी ग्रा.प.संरपच निरुपाताई बोरकर, बोंडगाव देवी ग्रा.प.संरपच प्रतिभाताई बोरकर, दाभना ग्रा.प.संरपच लिनाताई प्रधान, राधेश्याम झोळे, रत्नाकर बोरकर, .भाग्यवान फुल्लुके, .मोरेशवर सोनवाने, सुखदेवजी मेंन्ढे, काशीनाथ कापसे, पुरुषोत्तम डोये, प्रकाशजी शिवणकर, भागवत लंजे, गोपीचंद राजगिरे सह ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.