अर्जुनी मोर. येथे पहिले अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलन थाटात

0
10

◽◾ संमेलनाला लाभली साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती !
अर्जुनी मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे)- एस.एस.जे. महाविद्यालयात पहिले अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलन दि.२८जानेवारीला थाटात पार पडले.या संमेलनाचे अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.शिवाजीराव शिंदे होते.तर उद्घाटन आमदार मनोहरराव चंद्रिकापूरे यांच्या हस्ते झाले.
दोन सत्रात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रथम सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन तद्वतच सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, आदि क्षेत्रातील नामवंत मंडळीचा सत्कार सोहळा घेण्यात आला.यावेळी विचार मंचावर आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुनकरण चितलांगे, बद्रीप्रसाद जायस्वाल, मुकेश जायस्वाल,प्राचार्य डॉ. ईश्वर मोहूर्ले, नगरसेवक दानेश साखरे ,शारदा राजकुमार बडोले, एस.एस.जे महाविद्यालय इतिहास विभाग प्रमुख डॉ.प्रा. डॉ. कल्पना सांगोळे, आंबेडकरवादी साहित्यिक मुन्नाभाई नंदागवळी, जेष्ठ व प्रख्यात कवियत्री अंजनाबाई खुणे,टी .एन .बोरकर, मातोश्री जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक सचिव प्रा. छाया बोरकर उपस्थित होते.सर्वप्रथम थोर महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्यिक ,शैक्षणिक, अश्या विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्तीची निवड करून निवड पत्र देऊन आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी विशिष्ट क्षेत्रात पारंगत असलेल्या नामवंत व्यक्तींची निवड करून या संमेलनात सोळा मान्यवर व्यक्तींचा शाल ,सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व फोटोफ्रेम देवून गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक पुरस्कारर्थी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

डॉ. शिवाजी राव शिंदे यांना भारत साहित्य भूषण पुरस्कार, डॉ.कल्पना सांगोळे भारत समाजभूषण पुरस्कार, शारदा राजकुमार बडोले भारत स्त्रीरत्न पुरस्कार, प्रा.मुन्नाभाई नंदागवळी इंडियन आयडल स्टार अवॉर्ड, दिनेश कुमार अंबादे साहित्यरत्न पुरस्कार, प्रा. प्रकाश वाकडे भारत जीवन गौरव पुरस्कार, श्रीमती मंगला भवर बेस्ट ऑफ टीचर अवार्ड, प्रीती चहांदे राजमाता जिजाऊ पुरस्कार, शोभाताई घुंगरे “अस्तित्व” पुस्तकांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, “बिरसा मुंडा जननायक” या पुस्तकांसाठी प्रब्रम्हानंद मडावी यांना उत्कृष्ट चरित्र ग्रंथ पुरस्कार, उमा गजभिये यांना “अलगुज” काव्यसंग्रहा साठी बेस्ट बुक ऑफ अवार्ड,वर्षा अनिल शेंडे, चंद्रपूर स्त्री नारीशक्ती अवार्ड, प्रकाश नामदेव ढोले साहित्यरत्न पुरस्कार ,क्षितिजा बापट गोंदिया सावित्री बाई फुले पुरस्कार डॉ.नूरजहान पठाण राजमाता जिजाऊ पुरस्कार, निलेश भांडारकर बेस्ट ग्राफिक्सकार पुरस्कार देण्यात आला.
दिनेश कुमार अंबादे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक, कवी , लेखक प्रा .छाया बोरकर यांनी प्रस्ताविक केले. तर उपस्थितीतांचे आभार रंगारी (नवेगांव बांध) यांनी मानले .
दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान नागपूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री सुकेशिनी बोरकर यांनी भुषविले. कवी संमेलनासाठी प्रसिद्ध झाडीबोलीतील कवियत्री अंजनाबाई खुणे व उमाताई गजभिये प्रामुख्याने उपस्थित होत्या. सोलापूर पासून तर गोंदिया पर्यंतच्या चाळीस कवी कवित्रीने या आयोजित कवी संमेलनात आपला सहभाग नोंदविला ह्यात केवलचंद शहारे, के रंगारी, अश्विनी टेंभुर्णी, मुरलीधर खोटेले, कुंजीराम गोंधळे, चंदू पातोडे ,सुधाताई मेश्राम, रंजना ब्राह्मणकर, वैशाली मेश्राम, प्रतिभाताई खोब्रागडे, किशोर डोंगरवार,, क्षितिजा बापट, चंद्रकांत शिंदे, वर्षा शिंदे, मगनलाल बगमारे,हंसराज खोब्रागडे, प्रतिभा रामटेके, रंजना ब्राह्मणकर, प्रा. पूजा गौतम प्रणाली, प्रा.लक्ष्मीकांत कापगते, डॉ. अल्का दूधबुरे,सुदर्शन ,डॉ. कल्पना सांगोळे ,उमा गजभिये, आदिंचा समावेश होता.कवि संमेलनात कवींनी बहारदार कविता सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली कविसंमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येक कवीला सन्मानपत्र पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन, सन्मानित करण्यात आले. सदरहु कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ख्यातनाम गझलकार विनोद गहाणे यांनी केले.