
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन
अर्जुनी मोर.-शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोर. च्या रासेयो विभागातर्फे मौजा माहुरकुडा येथे ‘विकसित युवा विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ 29 जानेवारी 2024 ला पार पडला. शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ सविताताई कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहूर्ले, विशेष अतिथी म्हणून डॉ. सोमदत्त करंजेकर अध्यक्ष वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर, जि. प. सदस्या कविताताई कापगते, सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे, उपसरपंच श्रीमती डोंगरे ताई, आक्यूएसी समन्वयक डॉ. के. जे. सीबी, मुख्याध्यापक श्री हातझाडे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रारंभी शिबीर आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून शिबिर प्रमुख डॉ. एम. आर. दर्वे यांनी मांडली. यावेळी विशेष अतिथी डॉ. करंजेकर यांनी देशाचा विकास युवकच करु शकतात त्यासाठी रासेयो स्वयंसेवकानी पुढे आले पाहिजे, हे सप्रमाण पटवून दिले. रासेयो शिबीर हे आपल्या जगण्याला शिस्त लावण्याचे विचारपिठ असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ मोहूर्ले यांनी व्यक्त केले. भारत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित डॉ कल्पना सांगोळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते व आभार शिबीर संयोजक डॉ. आशिष कावळे यांनी मानले. या समारंभाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी मंडळी व शिबिरार्थी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीेतेकरिता करिता रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ दर्वे, डॉ. कावळे. डॉ. स्वाती मडावी, प्रा. कापगते प्रा. पंकज उके, प्रा. नाकाडे परिश्रम घेत आहेत.