ओबीसी जनगणना संकल्प यात्रा गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी होणार दाखल

0
9
गोंदिया: ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात सात जिल्ह्यांतून ओबीसी जनगणना यात्रा काढण्यात येत आहे.वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून ३ फेब्रुवारी रोजी यात्रेला प्रारंभ झाला असून 6 फेबुवारीला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथे ही यात्रा सकाळी 9 वाजता दाखल होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फेत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यामार्फत २३ जानेवारी ते 2 फेबुवारी या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले.ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालय खटला,रोहिणी आयोग, भारत सरकार व नीती आयोग नेहमी ओबीसी डेटाची मागणी करते. परंतु १९३१ पासून आतापर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे भारत सरकारकडे हेटा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक वेळा न्यायालयात अथवा धोरण ठरविताना शासनाला अनेक अडचणी येतात.त्यामुळे मंडल आयोगाने ठरविलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.
बिहार राज्याची जनगणना यशस्वी झाली की आपणसुद्धा समिती तयार करुन जातीनिहाय जनगणना करु असे, २९ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील विविध ओबीसी संघटना आणि राज्य शासन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यासह उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले होते. ओबीसी समाजाकडून मागणी लावून धरली जात आहे. या यात्रेत ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर, ओबीसी अधिकार मंच संयोंजक खेमेंद्र कटरे,अशोक लंजे,कैलास भेलावे,राजीव ठकरेले,राजूू चामट,नरेश भांडारकर,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे एस.यु.वंजारी,रवी अंबुले,राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे लिलाधर पाथोडे, महात्मा फुले समता परिषदेचे राजेश नागरिकर,विष्णू नागरीकर,सविंधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे,सी.पी.बिसेन,मराठा सेवा संघाचे सुनिल तरोणे,भारतीय पिछडा शोषित  संघाचे प्रेमलाल साठवणे,बहुजन युवा मंचचे रवि भांडारकर,भुमेश ठाकरे,आर.आर.अगडे,लिलाधर गिर्हेपुंजे,भुमेश शेंडे,जगदिश बावनथडे,दिनेश हुकरे,रमेश ब्राम्हणकर,सुनिल पटले,गणेश बरडे,रामभगत पाचे,उमेशकुमार कटरे,प्रहारचे महेंद्र भांडारकर,प्रा.राजेंद्र पटले,जिवन शरणागत आदींनी केले आहे.
6 फेबुवारीला सकाळी 9 वाजता तिरोडा तालुक्यात होणार आगमन
९.३० मुंडीकोटा , ९.४५ वा- पांजरा कार्नर सभा, सरांडी-विहिरगाव-
बिर्सीफाटा सकाळी १०.३० (चौक कार्नर सभा)
– वडेगाव सकाळी ११.०० वाजता कार्नरसभा
खुर्शीपार-बेरडीपार- १२.००वाजता
सुकळी कार्नर सभा सुकळी से १ बजे रवाना पिंडकेपार- खाडीपार आगमन १.३० वाजता
कुर्हाडी- कवलेवाडा २.०० वाजता कार्नरसभा, कवलेवाडा से २.३० रवाना
रापेवाडा सांय २.४५ चुटीया ३.०० ढाकणी-हिवरा- पांढराबोडी ४.०० दासगाव ४.३० – काटी ५.००- रावणवाडी ६.०० ,कामठा मुक्काम सायं ७.००
 7 फेबुवारीला सकाळी 9 वाजता भोसा,कालीमाटी,आमगाव,कावराबांध,सालेकसा,साखरीटोला,तिगाव,तुमसर,तिल्ली मोहगाव,जांभळी,पळसगाव डव्वा,दुपारी 2 वाजता सडक अर्जुनी,सौंदड,साकोलीकडे रवाना होईल.