पक्ष्यांची शिकारप्रकरणी पाच शिकारी वनविभागाच्या ताब्यात

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा(Bhandara) : पवनी वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनकर्मचार्‍यांनी नुकतिच टेकाडी शिवारात पक्ष्यांची शिकार(poaching of birds) करणार्‍या ५ शिकार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून २८४ मृत पक्षी हस्तगत करण्यात आले. वनविभागाच्या कारवाईने शिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.पवनी वनापरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांना मिळालेल्या माहितीवरून टेकाडी शिवारालगत पक्ष्यांची शिकार करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून विक्री करण्याच्या उद्देशाने शिकार्‍यांनी शिकार केल्याचे पिवळ्या गळ्याची २८४ मृत चिमण्या तसेच पक्षी पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी व इतर साहित्य जप्त करून गोपिचंद शेंडे रा.अर्जुनी (मानेगाव), भाऊराव मेश्राम रा.ढिवरवाडा, विलास भुरे रा.नवेगाव ता.कुही, सुनिल शेन्डे रा.अर्जुनी (मानेगाव) व नितीन केवट रा.नवेगाव ता.कुही यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला. सर्व शिकार्‍यांना(poachers in custody) न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय पवनी येथे हजर केले. न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. घटनास्थळी सहा.वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषारी नागदेवे, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही.ठोकळ, मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.एच.जी.भोयर, वनपाल काटेखाये, गिदमारे, हुकरे, खंगार, झंजाड, गजभिये, भोगे, घुगे, मंजलवाड, सिंदे व वनमजूर उपस्थित होते. सदर प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक राहूल गवई यांचे मार्गदर्शनात सहा.वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली नागदेवे करीत आहेत.