हिंगणघाट शहरात रात्रीत घडला प्रकार
कंत्राटदाराला बंदिस्त करण्यात रहिवासी महिलांचा पुढाकार
वर्धा – हिंगणघाट येथे म्हाडा इमारतीमधील गाळ्याची विक्री व देखरेख करणाऱ्या कंत्राटदाराला रात्री कार्यालयाच्या आवारात गेटला कुलूप ठोकून डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. येथे राहायला आलेल्या पंचवीस राहिवाश्यांचे वीज आणि पाण्याचे कनेक्शन या कंत्राटदाराने बिल न भरल्यामुळे कापले गेले. त्यामुळे येथील राहिवाश्यानी रोष व्यक्त केला आहे. तब्बल पाचशे चौतीस गाळ्यांची ही म्हाडाची इमारत असून येथे राहायला येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जे येथे आले त्यांना सुविधांच दिल्या गेल्या नाहीत. येथील महिलांनी पुढाकार घेत कंत्राटदार जितेंद्र कामत याला जाब विचारला, त्याला डांबून ठेवत आपल्या समस्यांकडे राहिवास्यांनी लक्ष वेधले आहे. रात्री तब्बल पाच तास डांबून ठेवल्यानंतर हिंगणघाट येथील पोलिसांच्या मध्यस्थीने या कंत्राटदारांची सुटका करण्यात आली आहेय. गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिक पाणी आणि विजेपासून वंचित आहे. हिंगणघाट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या म्हाडा च्या इमारतीमध्ये गाडे वितरित झालेले रहिवासी येथे राहायला आले, पण येथे सुविधाच नसल्याने अधिकारी आणि कंत्राटदारापुढे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचलाय. कंत्राटदार सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.