राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
. शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम
. स्थानिक रेला नृत्याला प्रेक्षकांची पसंती
गोंदिया, दि.15 : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस प्रसिध्द शास्त्रीय संगीत गायक राहुल देशापांडे यांनी गाजवला. पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडली कोणी, आओगे जब तुम साजना अंगणा फुल खिलेंगे… राहुल देशपांडे यांनी महासंस्कृती महोत्सवात गायलेल्या अशा अनेक मराठी हिंदी गाण्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. राहुल देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने श्रोते भारावून गेले. शास्त्रीय संगीतात श्रोते गण तल्लीन झाले होते. शास्त्रीय संगीत व भजनाच्या माध्यमातून एकंदरीत तिसरा दिवस क्षणभर का होईना ताण, तणाव व दुःख विसरायला लावणारा राहिला.
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही… देव नाही देव्हाऱ्यात, चंदनाची चोळी… सारे गमं पधंनी सा, सागरा कोजागिरीचा सागरा, गणी सा गा मा, सानी धनी सा, सारे गमं पा, तुच आहे पश्चिमेचा गार वारा, तरुण आहे – तरुण आहे. घर थकलेले सन्याशी, घर सोडून संध्यावाणी, पक्ष्यांचे घरटी होती ते झाड तोडली कोणी, आओगे तुम साजना अंगणा फुल खिलेंगे, नैना तेरे कजरारे, बरसेगा सावन झुम झुमके, पाणी पाणी रे… खाली पाणी रे पहाडो का, सरकती जाये रुखसे नकाब आहिस्ता आहिस्ता, जवाँ होने लगे जब ओ कर लिया हमसे परदा, निकलता रहा है फरिश्ता आहिस्ता आहिस्ता, कभी फुरसत से हिसाब कर लेना आहिस्ता आहिस्ता, हम बेवफा हरगीज न थे पर हम वफा कर न सके, तुमने जो देखा सुना सच था मगर कितना था सच ओ किसको पता, छंद मकरंद – प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद, मिटता कमलदल होई बंद भृंग परि सोडिना ध्यास गुंजनात दंग, दिल की तपीश आज… इत्यादी सुमधूर गाणे प्रस्तुत करुन तसेच कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा… हे भजन गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी स्थानिक लोककला रेला नृत्य सादर करण्यात आले. संजीव बापट यांनी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा… हे सुमधूर गीत प्रस्तुत केले. उपस्थित सर्व कलाकारांचा जिल्हा प्रशासनाद्वारे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा सत्र व न्यायाधीश अरविंद वानखेडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सकलेश पिंपळे, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उध्दव नाईक यांचेसह रसिक बंधू-भगिनी, कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.
शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथून ही मॅरेथॉन सुरू होणार आहे. सायंकाळी ६ वाजता स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुध्द जोशी आणि सहकलाकारांचा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून बहारदार गाण्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.