गोंदिया : श्री शिव छत्रपती मराठा समाज गोंदिया व्दारा गोंदिया स्थित मनोहर चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ पर्वावर प्रतिमा अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सौ.परिणीती परिणय फुके,चिन्मय गोतमारे,अशोक इंगळे,दामोधर अग्रवाल,राजेंद्र जगताप,दिपक कदम,भावना कदम,आदित्य सावंत, द्वारकाताई सावंत,हुकूम अग्रवाल, मायाताई सनत,राजा कदम,संतोष जाधव, शिलाताई सावंत उपस््थित होते.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमा अनावरण सोहळा प्रसंगी आम्हाला गौरवान्वित वाटते, त्यांच्या आदर्शावर चालणे व स्वप्नातील समाज घडविण्याचे आपण सर्वांचे ध्येय असले पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दानकर्ते आदित्य सावंत यांचे श्री जैन यांनी अभिनंदन केले. यावेळी मोठया संख्येने शहरवासी उपस्थित होते.