अर्जुनी मोरगांव -तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत शाळा दुरुस्ती,15 वा वित्त आयोग जिल्हा स्तर अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम आणि 9505 अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत नाली बांधकाम विकास कामांचे भूमिपूजन बोंडगाव/देवी जि.प.क्षेत्राचे जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांच्या शुभ हस्ते पार पडले.यावेळी सरपंच विलास फुंडे,उपसरपंच निवृत्ता शेंडे, माजी सरपंच प्रज्ञा डोंगरे,गौरीशंकर ब्राम्हणकर,खुशाल तवाडे,भाजपा महामंत्री लैलेश शिवनकर यांचेसह गावकरी उपस्थित होते.