अर्जुनी मोर.-अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, शौर्य, पराक्रमी,कीर्तिवंत राजे शिवरायांचा आज जन्मदिनानिमित्त प्रत्येकानी शिवरायांचे शिवविचार घराघरात, मनामनांत रुजवावे.तेव्हा खर्या अर्थाने शिवराज्याची निर्मिती होईल असे विचार अर्जुनी /मोर.विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते. ते पुढे म्हणाले की, आज चार शतकापूर्वीची परिस्थिती अत्यंत खडतर स्थितीत शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळी जिजाऊ मातेच्या प्रेरणेने शिवरायांचे विचार शितिजापलीकडील होते. सर्वधर्म समावेशक, बहुजन प्रतिपालक होते. घराघरात शिवजयंती साजरी करून आपल्या पिढीला शिवविचार रुजवावेत असे मत व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन करताना दुर्योधन मैंद म्हणालेत की, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण. छत्रपती शिवराय हे बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी होते. याचे अनेक दाखले शिवचरित्रात पाहावयास मिळतात. त्यांनी कधी भविष्य, पंचांग,मुहूर्त पाहून कार्याला सुरुवात केली नाही. शिवरायांना परस्त्री माते समान होती. म्हणून त्यांनी जिजाऊंचा आदर्श घेऊन मातृसत्ताक पद्धती अवलंबिले होती. अशा लोककल्याणकारी राज्याला मानाचा मुजरा अर्पण केला.
यावेळी कार्यक्रमाला भोजराम रहिले ,शालिक हातझाडे,उद्धव मेहेंदळे, नरेंद्र रंगारी, रतीराम राणे,नाशिक शहारे ,डॉ दीपक रहिले ,नानाजी पिंपळकर ,पिंटू जिवानि ,राकेश जैस्वाल,विजय आरेकर, राजू मेश्राम, सुशीला हलमारे ,निशा मस्के, माधुरी पिंपळकर ,अनीसा पठाण, सुनीता जैस्वाल, योगिराज हलमारे,देवानंद नांदेस्वर,विकास रामटेके आदी उपस्थित होते.