अर्जुनी मोर-तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी नक्षलप्रभावीत इळदा येथे डॉ. भारत लाडे मित्रपरिवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अर्जुनी मोर. आणि समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील पंधरा वर्षापासून समाजाच्या हिताचे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा समग्र महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूर्वदिनी दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला डॉ. भारत लाडे मित्रपरिवार व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी, चष्मे वितरण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तगट तपासणी घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या स्वागत व मार्गदर्शनाने करण्यात आली. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मा. डॉक्टर भारत लाडे यांनी समाजसेवेचे महत्व पटवून दिले व समाजातील दुर्बल, वंचित व गरीब लोकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक बाबी कशा दूर करता येतील याकडे लक्ष वेधले. ईळदा सारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागात आरोग्य सुविधांचा फारच अभाव आहे. त्यामुळे त्यांना नेत्राचिकित्से सारख्या अतिशय महत्वाच्या सेवा मिळू शकत नाही. अशा गरजू रुग्नाकरिता या शिबिरांच्या मार्फत जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त होते व यातूनच खरी समजसेवा आणि देशसेवा करण्याचे पुण्य लाभते असे प्रतिपादन डॉक्टर लाडे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अनाथ मुलांच्या मदतीकरिता जीवनोपयोगी साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात तालुक्यातील परसटोला येथील कुटुंबातील अनाथ बालकांना साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर लगेचच मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटपास सुरुवात करण्यात आली. या नेत्र चिकित्से करिता 748 रुग्णांची मोफत नेत्रचिकित्सा करण्यात आली. त्यापैकी 387 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व यातील 101 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांचे रक्तगट माहिती नव्हते अशा एकूण 193 रुग्णांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणी करिता रुही ल्याब अर्जुनी यांचे सहकार्य लाभले. दरम्यान सर्व रुग्णांना व बाहेरगाहून आलेल्या पाहुणे मंडळींना अल्पपोहाराची व चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रामुख्याने दिलीप बनसोड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया, श्रीकांत घाटबांधे,घनश्याम धामट , फुलचंद बागडेरिया, आशिष कापगते, सर्वेश भुतडा, सुनील लंजे, डॉ. पिंकू मंडल वैद्य. अधि. केशोरी, डॉ. चंद्रमुनी लाडे, सौ संगीताताई कळयाम सरपंच इडदा, संपतराव उईके, चंदरसिंग जुडा, रामायण सोनवाणे, आणि समस्त डॉ. लाडे मित्रपरिवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संदीप भंडारी यांनी केले.