ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दया

0
10

 आमदार कोरोटे यांचे प्रतिपादन.

देवरी येथे कुणबी समाजाचा प्रबोधन,सत्कार व समाज भवनाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन.

देवरी दि. १९: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे .या समाजाच्या अस्तीत्वाची लढाई महाराष्ट्राचे कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत मी विधानसभेच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लढत आहो. आता मराठा समाजाच्या आरक्षणा विषयी सरकारच्या वतीने विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारने तैयारी दर्शवीली आहे. आम्ही सरकारला ठामपणे सांगतो की ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण गेले तरी चालेल पण कुणबी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दया. यात आम्हालाकुठल्याही प्रकारची अडचण नाही.असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज सेवा संस्था देवरी तालुकाचे अध्यक्ष राम गायधने हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रनिर्माण करिअर अँकाडेमी अमरावतीचे संचालक गजानन कोरे, गोंदियाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. निळूभाऊ बहेकार, शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूरचे प्राध्यापक अनुपमाताई मेंढे व नागपूरचे विजय फुंडे(संतोष पकोडेवाला) यांच्यासह कांग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सुनंदाताई बहेकार,पं.स.सदस्य रंजीत कासम,माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार, विनोद भेंडारकर यांच्यासह तालुक्यातील सर्व कुणबी समाजाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.

हा मेळावा कुणबी समाजाला प्रबोधन मिळावं व संकटकालात परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात ऊंच भरारी घेणारे समाज बंधु भगिनीं चा सत्कार समारंभ ठेवुन समाजातील व्यक्तीना प्रेरणा मिळावी त्यांनी शुध्दा आपल्या आयुष्यात चांगले काम करावे हा ध्येय कार्यक्रमाचे अध्यक्ष राम गायधने यांनी ठेवत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शक पाहुणे व वक्ते गजानन कोरे यांनी युवकांनी स्वतःच्या विचाराने चालावे.जिवन आपले आहे पनं आपन विचार दुस-्याचे विचार घेऊन आपली प्रगती होत नाही. कोणत्याही परंपरा व कर्मकांड यावर चिकित्सक बुद्धिने विचार करून आपल्या मनातील घान बाहेर काढ़ने आवश्यक असून युवकांनी शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, सयाजीराव गायकवाड,ज्योतीराव फुले,सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचे वाचन करुन स्वतःचा विकास व समाजाचा विकास करावा असे आपल्या शब्दातुन विचार व्यक्त केले. तर डॉ.निळूभाऊ बहेकार यांनी समाजाचा विकास झाला पण टक्केवारी कमी आहे.आजची पिढी ही विनाकारण कामात आपले जिवन वाया घालवित आहे ही समाजाची मोठी शोकांतिका आहे.मोबाईल हा आपले जिवन चांगला करण्यासाठी न करता वाईट करण्यासाठीच जास्त उपयोगी आजची पिढी करित आहे असे म्हटले. आणि अनुपमा मेंढे यांनी समाजाचा विकास करायचा असेल तर महीलांना सोबत घेणे आवश्यक आहे.शिक्षण घेवुन चुकीच्या प्रवाहात गेलो तर शिक्षणाचा काही उपयोग नाही.असे म्हटले तर यशस्वी उद्योजक विजय भाऊ फुंडे ( संतोष पकोडे वाला ) यांनी आपल्या जिवनात आपले ध्येय निश्चित असले तर आपण निश्चित य़शस्वी होतो.असे म्हटले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रतिराम डोये यांनी तर सूत्रसंचालन गणेश मुनीश्वर, हर्षदा कोनतो़डे आणि उपस्थितांचे आभार आभार चेतनकुमार झंजाळ यांनी मानले. देवरी तालुक्यातील सर्व गावपातळीवरील कुणबी समाज बांधव उपस्थित राहुन कार्यक्रमाला सहकार्य केले.