खादी ग्रामोद्योग विभागाचा २३ फेब्रुवारीला मेळावा

0
2

. योजनांची मिळणार माहिती

गोंदिया, दि.21 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी मंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी कुऱ्हाडी ता. गोरेगाव येथे एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये शासनाचे कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती इत्यादी शासकीय कार्यालयाचा सहभाग सुध्दा राहणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चंद्रजित देवीपुत्र यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन ) संपुर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेअंतर्गत महिला युवक-युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरिक, अनुसुचीत जाती जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, स्वयंसहायता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहिन, पारंपारिक कारागिर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येतात. सदर योजने अंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यात येऊन अनुदानाचा लाभ देण्यात येते. मध योजने अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिंना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.

योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी मंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये शासनाचे कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती इत्यादी शासकिय कार्यालयाचा सहभाग सुध्दा राहणार आहे. ग्रामपंचायत सभागृह कुहाडी ता. गोरेगाव येथे हा मेळावा आयोजित केला असून वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत राहील. सदर मेळाव्यात प्रवेश नि:शुल्क राहील. इच्छुकांनी नाव नोंदणी करून त्यांचे फॉर्म भरून घेण्यात येतील. तरी सदर शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात आले आहे.