गोरेगाव– स्थानिक पी.डी.राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे आयोजित निरोप समारंभ व विद्यार्थ्यांच्या सायकल वितरण कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.मोरघडे यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणात सांगितले की यशस्वी होण्यासाठी जी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा. तसेच वर्ग 8 वीच्या विद्यार्थ्यांना सायकल चे वाटत करण्यात आले.
विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांनां निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य सी.डी.मोरघडे हे होते.तर पर्यवेक्षक ए एच कटरे,वाय के चौधरी,एस आर राहांगडाले,आर टी पटले,आर वाय कटरे,एस पी तिरपुडे,एस आर मांढरे,ए एस बावनथडे,एस जी दमाहे,यु जी लांजेवार, झेड सी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वर्ग नववी च्या विद्यार्थ्यांनी केले.