अर्जुनी मोरगाव,दि.24- गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पाठविण्यासाठी आदिवासी अधिकार बहुजन महासभेचे ४ मार्च २०२४ ला एकोळी रोड साकोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने २२ फेब्रुवारी २०२४ ला वंचित बहुजन आघाडी कार्यालय अर्जुनी मोरगांव येथे पक्षाची सभा घेत साकोली येथील आयोजित आदिवासी अधिकार बहुजन महासभेला मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करण्याकरीता नियोजन करण्यात आले.प्रत्येक पदाधिकार्यांना तालुकानुसार जबाबदार्या देण्यात आल्या.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महादेव सलामे,जिल्हा युवक आघाडी महासचिव ॲड.सुरज रंगारी,तालुका अध्यक्ष किशोर तागडे,तालुका युवक अध्यक्ष कैलास इस्कापे, तालुका युवक उपाध्यक्ष दिपेंद्र उके,तालुका युवक महासचिव रोहित रामटेके,तालुका युवक सहसचिव हर्षपाल लोणारे,तालुका युवक प्रसिद्धी प्रमुख विश्वरत्न रामटेके,संजय लोणारे,आकाश तागडे,भगवान नंदेश्वर,राहुल रंगारी आदी उपस्थित होते.