इंग्रजाच्या काळात जेवढे अत्याचार शेतकऱ्यांवर झाले नाही, त्याच्यापेक्षा अधिक अत्याचार मोदी सरकार शेतकऱ्यांवर करीत आहे – इंजि राजीव ठकरेले
गोंदिया,दि.24- शेतकरी आपल्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करीत आहे. या आंदोलनात दिनांक 22 फरवरी रोजी पंजाबच्या खिन्नोरी फाटकावर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवून ठेवलेला आहे. त्यांना थांबवण्यासाठी व आंदोलनाला संपवण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांवर हसू गॅसचे गोले व गोडीबारी करीत आहे याच गोडीबारी मध्ये 21 वर्षीय तरुण शेतकरी शुभकरण सिंगच्या डोक्यात गोळी लागली. आणि तो आंदोलनाच्या ठिकाणीच मृत्युमुखी पडला. शेतकऱ्यांना जीवे मारणे हे मोदी सरकार साठी काही नवीन नाहीये मागे आपल्या व्यापारी मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठी तीन काळे कायदे मोदी सरकारने आणले होते. त्याच्या विरोध म्हणून शेतकऱ्यांनी पूर्ण देशभरात आंदोलन केले त्यात ७५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मृत्युमुखी पाळण्याचा काम मोदी सरकारने केलेला आहे. असं वाटते की इंग्रजांनी जेवढे अत्याचार शेतकऱ्यांवर केले नाही, त्याच्यापेक्षा अधिक अत्याचार भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार करत आहे.शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनही पूर्ण करत नसून शेतकऱ्यांवर गोळी घालून त्यांना मारण्याचं काम ही मोदी सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन थांबल्या पाहिजे यासाठी आंदोलन क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद केली जात आहे आंदोलनाची बातमी थांबवण्यासाठी सोशल मीडिया कंपनीवर दबाव टाकून आंदोलनाची बातमी डिलीट करण्याचे निर्देश देण्यात येत आहे. लोकतंत्राला पूर्णतः संपवण्याचे काम व फक्त आपल्या व्यापारी मित्रांना फायदा पोहोचण्याचा काम ही मोदी सरकार करत आहे याची टीका काँग्रेस पार्टी पूर्ण देशभर करत आहे. मोदी सरकारची शेतकऱ्यांबद्दलची वागणूक ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मोदी सरकारच्या या दडपचाहीच्या विरोधात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे व शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी शहीद झालेल्या तरुण शेतकरी शुभकरण सिंग यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काँग्रेस तर्फे पूर्ण देशात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात क्रमांक गोंदिया येथील शहीद भोला काँग्रेस भवन मध्ये आज श्रद्धांजली सभा घेण्यात आली त्यात तालुक्याचे अध्यक्ष रमेश अंबुले, माजी अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, उपसभापती राजकुमार पटले, संचालक इंजि राजीव ठकरेले, माजी उपसभापती चमनभाऊ बीसेन, ब्रिजलाल पटले, सिद्धार्थ गणवीर, आनंद लांजेवार, अजय राहांगडाले, मनीष चव्हाण, दलेश नागदवने, शिवानंद हरिणखेडे, आकाश चौव्हाण पंकज पिल्ले, कृष्णा बिभर सह इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते