अर्जुनी मोर. :- ) अर्जुनी मोर. ग्रामपंचायत संपुष्टात येवुन नगरपंचायतीची स्थापना होवुन आज जवळपास सात ते आठ वर्षाचा कालावधी होत आहे. ग्रामीण विभागातुन शहरी विभागात रूपांतर झाले. परंतु शहरातील गोरगरीब विविध योजनांपासुन वंचीत झाले आहेत. उदा.मग्रारोहयोची कामे,अनेक वैयक्तीक लाभाच्या योजना, घर जमिनीचे पट्टे व शिख समाजाला जातीचे दाखले अशा कितीतरी समस्यांना अर्जुनी मोर. शहरवासियांना मुकावे लागले. हे सर्व प्रश्न मार्गी कसे लागतील या संदर्भात माजी मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांनी ता.२८ फेब्रुवारीला सिंगलटोली ( अर्जुनी मोर. )येथे महिला मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष मंजुषा तरोणे यांचे घरी भेट देवुन सिंगलटोली येथील नागरीकांशी जवळीक साधून तथा अर्जुनी मोर. उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांना बोलावून त्यांना समस्या अवगत करुन दिल्या.तसेच या समस्या कशा पध्दतीने सोडविल्या जावु शकतात.या बाबत सविस्तर चर्चा केली.
प्रामुख्याने घर जमिनीचे पट्टे न मिळाल्यामुळे शासनाचे घरकुल योजनेचे घरे मंजुर होवुनही घरांचे बांधकाम करता येत नाही. यासाठी अनेक लाभारथ्यांचे वनहक्क जमिनीचे प्रस्ताव सादर होवुनही ते प्रस्ताव कुठे गहाळ झाले. त्याचा ठावठिकाणा नसल्याची कैफियत नागरीकांनी माजी मंत्री राजकुमार बडोले तथा उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांचे पुढे मांडली.त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून सिंगलटोली अर्जुनी मोर. येथे वात्सव्यास असलेले शिख सिकलगार समाजातील ४०,ते ५० कुटुंबातील लोकांना भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे हा समाज शासनाच्या विविध योजना पासुन वंचीत आहे.अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले व उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी सिंगलटोली येथे नागरीकांसोबत सविस्तर चर्चा करुन काही तरी तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, मंजुषा तरोणे, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा गिताबाई ब्राम्हणकर, नगरसेविका सपना उपवंन्सी, व अन्य कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.