भाविकांच्या सोयीसाठी सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे करा- विजया बनकर

0
19
• प्रतापगड यात्रा आढावा       गोंदियादि.1 : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड’ हे  हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असून या ठिकाणी महाशिवरात्री जत्रेकरिता विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून जबाबदारीने कामे करावेअसे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी संबंधित विभागाला दिले.

        महाशिवरात्री निमित्त प्रतापगड येथे यात्रा व्यवस्थापनाचे अनुषंगाने सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी संबंधीत विभागाचा पुर्वतयारी बाबत आढावा घेतांना त्या बोलत होत्या.  पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेजि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीरजि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडेउपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव वरूणकुमार शहारेउपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विवेक पाटीलतहसिलदार अनिरुद्ध कांबळे व  ग्रामपंचायत प्रतापगड सरपंच भोजराम लोगडे मंचावर उपस्थित होते.      

           निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती बनकर म्हणाल्याप्रतापगड यात्रेचे आयोजन महाशिवरात्री निमित्त 07 ते 13 मार्च 2024 दरम्यान (7 दिवस) करण्यात आलेले आहे. कार्यकारी अभियंता पीडब्ल्युडी क्र.02 तसेच जि.प. कार्यकारी अभियंता यांनी रस्त्यांची खड्डे बुजविण्याचे काम त्वरित करावे. शाखा अभियंता जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन क्लोरिनेशन करावे. ग्रामसेवकाने विद्युत विभागामार्फत पथदिवे लावण्याचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करावे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवावातसेच आरोग्य पथके स्थापित करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षकाने दुकानातील खाद्य पदार्थांची नियमित तपासणी करावी. कार्यकारी अभियंता सा.बां. विभागाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटींग त्वरित लावावे. एस.टी. महामंडळाच्या आगार प्रमुखाने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. नगरपंचायत मुख्याधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी अग्नीशमनची व्यवस्था करावी. नगरपंचायत मार्फत साफ-सफाई करण्याकडे विशेष लक्ष्य द्यावे. सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. यात्रे दरम्यान योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करावेअसे निर्देश विजया बनकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

        पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे म्हणालेयात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. यात्रे दरम्यान अवैध मद्यविक्री व इतर असामाजिक तत्त्वांवर आळा घालण्यासाठी पथकांची नियुक्ती करावी. जवळपास 500 ते 600 वाहने ठेवण्याची पार्कींग व्यवस्थावाहतूक व्यवस्थेचे नियोजन करून संपूर्ण यात्रा शांततेत पार पाडण्याकरीता एकजुटीने कार्य करावेअसे निर्देश पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिले.

        सभेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबेअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसेकार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह राज कुरेकारजिल्हा अग्निशमन अधिकारी निरज काळे,  पोलीस निरीक्षक केशोरी प्रताप भोसले व विविध विभागाचे कार्यालय प्रमुख व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.