अर्जुनी मोर.– तालुक्यातील गटग्रामपंचायत महालगाव येथे ग्रामपंचायत च्या उत्पनातुन ५ टक्के निधी खर्च करण्यात येते.त्यानुसार गटग्रामपंचायत अंतर्गत येणा-या चार गावातील २९ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी १ हजार ३०० रुपये प्रमाणे धनादेशाचे वाटप सरपंच मिनाताई शहारे यांचे हस्ते देण्यात आले.
अर्जुनी मोर. तालुक्यातील महालगाव गटग्रामपंचायत अंतर्गत तावसी खुर्द,निलज,महालगाव,व रामघाट ही चार गावे येतात.या चारही गावातील २९ दिव्यांग महीला पुरुषांना ग्रामपंचायतच्या उत्पनातुन धनादेसाचे वाटप ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले. यावेळी उपसरपंच नंदकिशोर गहाणे, सचिव अरुण हातझाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तथा कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच मिनाताई शहारे म्हणाल्या की गावपातळीवर काम करीत असताना ग्रामपंचायत च्या माध्यमातून ज्या काही सार्वजनिक विकासाच्या किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही सरपंच,उपसरपंच ,सचिव,व ग्रामपंचायत सदस्यांची असते.त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत.या चारही गावाचा सर्वांगीण विकास व्हावा हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे सरपंच मिनाताई शहारे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला २९ दिव्यांग लाभार्थ्यांसह ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.