अवैध गौण खनिज उत्खनन शोध पथकाची कारवाई,रेती तस्करांचे नावे गुलदस्त्यातच

0
6

सावंगीमध्ये अवैद्यरित्या डंम्पींग केलेली रेती केली जप्त
देसाईगंज दि.11–देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे अवैद्यरित्या रेती डंम्पींग केली असल्याची माहिती मिळताच अवैध गौण खनिज उत्खनन शोध पथकाच्या नेतृत्वात तीन ते चार ठिकाणी धाड टाकुन जप्त केले आहे. सदर अवैद्य रेती चा साठा कुणी केले याबाबत अद्यापही माहिती न मिळाल्याने दंडात्मक कारवाई केली नसल्याचे सांगीतले जात आहे.
देसाईगंज तालुक्यात विर्शि,कुरुड,कोंढाळा,सावंगी, जुनी वडसा, आमगांव ही वैनगंगा नदिवरील रेती घाट आहेत. तर शंकरपुर,किन्हाळा,उसेगाव, बोडधा,अरततोंडी, कोकडी, विसोरा ही गाढवी नदिवरील रेती घाट आहेत. या रेती घाटाच्या लिलावातुन शासनाला दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा महसूल मिळत असतो. रेती लिलाव प्रकरण थंडबस्त्यात असल्याने याचा गैरफायदा मात्र रेती तस्करांनी चांगलाच घेतला असुन वैनगंगा नदिवरील व गाढवी नदिवरील पात्रातील रेतीचा बेकायदेशिर उपसा करुन घाटातून रेतीची तस्करी केली जात असुन प्रती ट्रक्टर पाच ते सात हजार रुपये तर सतरा ते विस हजार रुपये प्रती टिप्पर ट्रक विकल्या जात आहे.
मात्र, देसाईगंज येथील रेती तस्करांनी एकत्र येत उपरोक्त रेतीघाटातून रात्रीच्या सुमारास ते पहाटेच्या सुमारास खुलेआम रेतीची तस्करी केली जात आहे.महसुल विभागाचे बरेच अधिकारी व कर्मचारी मुख्यालयीच रहात नसल्याने याचा गैरफायदा सुटीच्या दिवशी व शनिवार,रविवार ला रेती तस्करांचे चांगलेच फावते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे, याबाबतची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना असतांना मात्र याकडे महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. रेती तस्करांनी नदी पात्रात मोठमोठे खड्डे तयार केले आहेत.रेती ची चोरी होत आहे ही बाब महसुल अधिकारी खाजगीत मान्य करतात.मात्र कारवाई का करित नाही हे न उलगडणारे कोडेच आहे. दरम्यान, काल रात्री सावंगी येथील ५० ते ६० च्या संख्येने असलेल्या जागृत नागरिकांनी शासकीय जागेमध्ये अवैद्यरित्या डंम्पींग केलेली रेती जवळ पास पाच ते सहा ठिकाणी अवैद्य रेती चा साठा करुन ठेवले असुन जप्त करण्यात आले आहे. अवैद्य रेती करणारा तस्कर व अवैद्य रेती चा साठा करणाय्राचे नाव अद्यापही कळले नसल्याने दंडात्मक कारवाई केली नसल्याचे सांगीतले जात आहे..