आंचल सामाजिक संस्थेतर्पेâ महिला दिन साजरा
गोंदिया : आजच्या युगात महिला ही अबला नसून सबला झाली आहे. शासनाकडूनही महिला सक्षमीकरणावर भर देत आहे. महिलांना सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध करून समाजात महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले जात आहे. यामुळे महिलांनी समाजकार्यात अग्रेसर राहून सर्वच क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौ.शुभांगी सुनिल मेंढे यांनी केले
आंचल महिला बहु.सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ.मेंढे बोलत होत्या. कार्यक्रमाला अतिथी म्हणून सरीता कापगते, आधार महिला संघटनेच्या भावना कदम, शर्मिला पाल, शालिनी डोंगरे, डॉ.शारदा साबू, ललिता यादव, संगीता गुप्ता, मिलन काथरानी, रिया माधवानी, सुरेखा भेंडारकर, रिता बागडे, रमा मिश्रा, इंजी.शिखा पिपलेवार, संस्थेच्या अध्यक्षा राखी भारव्दाज, लक्ष्मी चौधरी, विजया ओझा, सरीता राठी, कुंदा चंद्रिकापुरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त करून महिलांच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा राखी भारव्दाज यांनी आंचल महिला बहु.सामाजिक संस्थेच्या वाटचाल आणि कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा भारव्दाज व रिध्दी राठी यांनी केले तर आभार राखी भारव्दाज यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता बिसेन, रूपाली रोटकर, सीमा पारधी, रंजीता कनौजिया, सरीता राठी, मेघा गुप्ता, मंजु भादुपोते, रमा मिश्रा, मनिषा सहारे, सीमा शहारे, पदमा गौतम, उमा सिंग, प्रियंका शेंडे, अरूणा उरबस्ते, कांचन भलावी, काव्या नामदेव, शंकुतला लोणारकर, सोनम, सुरेखा गायधने, ममता नौजिया, ज्योति कनौजिया, मौसमी भालाधरे आदिंनी परिश्रम घेतले.