“होय, आपण टिबीचा अंत करु शकतो “-जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार 

0
4

टीबी हरेगादेश जितेगा‘ च्या घोषणांनी दुमदुमले शहर
जागतिक क्षयरोग दिन- प्रभातफेरी व पथनाट्य कार्यक्रमाने क्षयरोग निर्मुलन जनजागृती

गोंदिया(दि.23 मार्च)– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा क्षयरोग केंद्र, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुशंगाने दि.23 शनिवारी रोजी दिवस साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम व शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणुन साजरा करण्यात येतो रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरीअम ट्युबरक्युलोसिस या जिवाणुचा शोध लावला. म्हणुन २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या रोगाने संपुर्ण जगाला विळखा घातलेला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासुन प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयामध्ये राबविला जात आहे.
अनेक रोगाचे समुळ उच्चाटन करण्यात यश आले ऑहे. परंतु क्षयरोगावर अदद्यापही पुर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही: ही चिंताजनक बाब आहे.
जिल्हा क्षयरोग केंद्र, गोंदिया येथे जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व डॉ.देवदास चांदेवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण,  केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.अजय घोरमारे, जिल्हा मौखीक अधिकारी डॉ.अनिल आटे ईतर मान्यवरांचे हस्ते डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर क्षयरोग जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला डॉ.नितीन वानखेडे, डॉ.अमरीश मोहबे व डॉ.अभिजीत गोल्हार यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले. प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंदिरा गांधी स्टेडियम मैदान-बाजार चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. होय टीबी संपवू शकतो, टीबी हरेगा देश जितेगा, टीबीचा मित्र निक्षय मित्र असे विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली.
महात्मा गांधी पुतळा जवळ क्षयरोग निर्मुलन जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. चौकात यावेळी सर्वसामान्य लोकांनी गर्दि पहावयास मिळाली.प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी , दृष्टी अशासकीय संस्थेचे कर्मचारी, शहरी भागातील आशा सेविका, तसेच केटीएस विभाग व क्षयरोग विभाग कार्यालयाचे अधिकारी व स्टाफ नर्स प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते. प्रभारफेरी दरम्यान बँनर द्वारे जनजागृती तसेच क्षयरोग आजाराबाबतचे पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.
जागतिक क्षयरोग दिन प्रभातफेरी व पथनाट्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा क्षयरोग समन्वयक प्रज्ञा कांबळे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात यांनी मोलाची कामगिरी केली. शेवटी क्षयरोग नियंत्रण प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमातंर्गत संबंधित विभागाच्या पथकाकडून जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय येथील दर्शनी भागात रांगोळी काढून रांगोळीच्या माध्यमातून क्षयरोग आजाराबाबतचे संदेश सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात सुत्रसंचालन पवन वासनिक व आभार प्रदर्शन प्रज्ञा कांबळे यांनी केले.