Home विदर्भ ईंदोरा /खुर्द मध्ये सामुदायिक औषधोपचार मोहिम

ईंदोरा /खुर्द मध्ये सामुदायिक औषधोपचार मोहिम

0

तिरोडा- राष्ट्रीय हत्तीरोग कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात दि. 26 मार्च ते 05 एप्रिल 24 दरम्यान हत्तीरोग आजारावर प्रतिबंधक सामुदायिक औषधोपचार मोहीम तिरोडा तालुक्यात राबवली जात आहे.तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक अंतर्गत उपकेंद्र  इंदोरा/खुर्द येथील गावात आरोग्य कर्मचाऱ्यां मार्फत सामुदायिक औषधोपचार मोहीम  संबंधाने जनजागृती मोहीम राबविवण्यात येत आहे.
मोहिमे दरम्यान गावामध्ये लोकांनी गोळ्या खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. 23 मार्च रोजी प्रतिबंधात्मक जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी दरम्यान उपकेंद्राचे आरोग्य सेविका प्रिती वडीचार, आशा सेविका लता रंहागडाले व अर्चना लांजेवार,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रिती भालाधरे, शिक्षकवृंद पटले सर, शरणागत मँडम, बंसोड मँडम व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी केली.
दि. 26 मार्च रोजी इंदोरा/खुर्द गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हत्तीरोग आजारावर प्रतिबंधक सामुदायिक औषधोपचार मोहीम बुथचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालण्यात आले. यावेळी उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. फटिंग सुद्धा उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे तिरोडा तालुक्यात राष्ट्रीय किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत समाजातील हत्तीरोग जंतुभार कमी करणे व हत्तीरोगाचा प्रसार थांबविण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन पात्र लोकांना डि.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळया आरोग्य कर्मचार्यामार्फत प्रत्यक्ष खाऊ घालण्यात  येणार आहे.
गोळ्या या सुरक्षित असून लोकांनी कुठलाही गैरसमज किंवा संकोच न बाळगता गोळ्या खाण्याचे आवाहन या वेळी आरोग्य कर्मचारी व शालेय शिक्षकामार्फत लोकांना केले आहे.बुथ पाठोपाठ गृहभेटी दरम्यान लोकांना गोळ्या खावु घालण्यात येणार आहे. 100 टक्के पात्र लाभार्थ्याना गोळ्या खावु घालण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आरोग्य कर्मचारी यांनी माहिती यावेळी दिली.

Exit mobile version