Home विदर्भ सोनी येथे एक कोटी 76 लाख रुपये रोख पकडली

सोनी येथे एक कोटी 76 लाख रुपये रोख पकडली

0

गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे आज निवडणूक पथकाला एक कोटी 76 लाख रुपये रोख वाहनात नेतांना आढळलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.दरम्यान जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्यामार्फेत सदर माहिती प्रसारमाध्यमांपर्यत देण्याआधीच नावाच्या प्रसिध्दीकरीता या पथकाने परस्परच प्रसारमाध्यमांने छायाचित्रासह माहिती पुरविल्याने सहाय्यक जिल्हा निवडणुक अधिकारी व तिरोडा उपविभागीय अधिकारी यांचे नियत्रंण पाहिजे तसे नसल्याचे पथकाच्या भूमिकेवरुन बघावयास मिळाले.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमुने आज ( दि. 27) रोजी सोनी गावाजवळील FST व SST टीमचे पथक प्रमुख बाबा शिंदे,सरिता लिल्हारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप , रामानंदा दास, श्यामकला भोयर , संदीप पटले यांनी संयुक्त कार्यवाही करत 1कोटी 76 लाख रक्कम जप्त केली. तसेच दुसरी कारवाई मुंडीपार नाक्यावर जवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पुन्हा 5 लाख रुपये रोख जप्त केले. यावेळी तहसीलदार किसन भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करुन रक्कम जप्त करण्यात आली.तसेच पंचनामा ESMS अँपवर भरून कार्यवाही केली.गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजय भुसारी व पोलीस उपनिरिक्षक घोलप यांनी कायदेशीर कार्यवाही केली.

राजकीय पक्ष, नागरिक व अन्य व्यक्तींनी आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रोख रक्कम वाहतूक करावी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version