Home विदर्भ सुर्याटोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

सुर्याटोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0

गोंदिया : स्थानिक सुर्याटोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सुर्याटोला वार्ड, शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती २८ मार्च रोजी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन पंकज यादव यांच्या हस्ते अशोक (गप्पु) गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून सुनिल केलनका, प्रमुख वक्ता वसंतराव बढे, धनलाल रहांगडाले, श्रीमती शालिनीताई रहांगडाले आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. वसंतराव बढे यांनी आजच्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकून छत्रपती शिवरायांचे आदर्श आत्मसात करण्याचे आवाहन केले. यानंतर छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या वतीने गुणवंत विद्यर्थिनी भैरवी गणेश रहांगडाले, अरूण तुपकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मुकेश चन्ने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरूण तुपकर, किसन वाढीवे, सोहन गौतम, नविन कटरे, गितेश तुपकर, दिपेश रहांगडाले, जितु चौधरी, जयेश तुपकर, विक्रम वाढीवे, राजु तुपकर, पंकज तुपकर, शुभम तुपकर, योगेश चन्ने, मीना तुपकर, मौसमी भालाधरे, प्रिती काळे, धनंजय काकडे, प्रिती केसलकर, वर्षा मानकर, मंजु नखाते, छाया वाढीवे, वंजारी, संतोषी तुपकर आदिंनी परिश्रम घेतले.

Exit mobile version