सामुदायिक औषधोपचार मोहिम यशस्वी करण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य प्रशासन “अ‍ॅक्शन मोड” वर

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोरगाव- हत्तीपाय रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दि.26 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम गोंदिया,तिरोडा ,गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात राबवली जात आहे. मोहिमे दरम्यान भावी पिढिला हत्तीरोगापासुन मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला असुन दिवस रात्र एक करुन लोकांना प्रत्यक्ष निशुल्क गोळ्या खावु घालण्यात व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दिवसा गृहभेटी दरम्यान आरोग्य कर्मचारी लोकांना गोळ्या खावु घालण्यासाठी जात आहे. पंरतु लाभार्थी हे रोजगार हमी योजना किंवा आपल्या कामा निमित्त घराबाहेर असल्याने रात्री पुन्हा गृहभेट करुन लोकांना गोळ्या खावु घालत आहे.
जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक हत्तीपाय आजाराबाबत रुग्णांची नोंद असल्याने मोहीम यशस्वी करुन 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना गोळ्या खावु घालण्यासाठी तालुका आरोग्य प्रशासनाने कंबर कसलेली आहे. आजी व माजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या एकत्रित सहकार्याने जनजागृती करण्यात येत आहे. डॉ.सुकन्या कांबळे व डॉ.विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी , आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व ईतर कर्मचारी वर्ग यांच्या सहाय्याने मोहिमे दरम्यान कार्यक्षेत्रातील लोकांना आपल्या भावी पिढिला हत्तीपाय या आजारापासुन वाचविण्यासाठी सर्व पात्र लोकांनी गोळ्यांचे सेवन करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे.गोळ्या या सुरक्षित असून लोकांनी कुठलाही गैरसमज किंवा संकोच न बाळगता लोकांनी गोळ्या खाण्याचे आवाहन डॉ.सुकन्या कांबळे यांनी यावेळी केले आहे.
डॉ.सुकन्या कांबळे, डॉ.विजय राऊत व त्यांचा तालुका आरोग्य कार्यालयाचे नियंत्रण पथक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी देवुन सामुदायिक औषधोपचार मोहिम कृती आराखडा नुसार कामकाज पार पडेल यावर ठाम आहे. तालुका स्तरावरील कृति दल समितीची बैठक घेवुन सर्व  विभागांच्या सहकार्याने मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोळ्या खाण्याविषयी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
तालुक्यातील शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बॅंक, सोसायटी, अंगणवाडी, शासकिय कार्यालय,आपला दवाखाना, आरोग्य संस्था, ई.ठिकाणी बुथाचे आयोजन करण्यात आले आहे तर उर्वरित लोकांना गृहभेटी दरम्यान आशा सेविका,अंगणवाडी सेविका,सामुदायिक आरोग्य अधिकारी, स्वंयसेवक, आरोग्य सेविका व ईतर आरोग्य कर्मचारी यांच्या पथकाच्या माध्यमातुन गोळ्या खावु घालण्यात येत असल्याचे डॉ. विजय राऊत यांनी माहीती दिली आहे.