हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेकरीता सहाय्यक संचालक डॉ. निमगडे पोहचले गावात

0
3

गोंदिया,दि.०१-जिल्ह्यातुन हत्तीपाय रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दि.26 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम गोंदिया,तिरोडा ,गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात राबवली जात आहे. मोहिमे दरम्यान भावी पिढिला हत्तीरोगापासुन मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य विभाग अहोरात्र कामकाज करत असुन दिवस रात्र एक करुन लोकांना प्रत्यक्ष निशुल्क गोळ्या खावु घालण्यात व्यस्त आहे.दिवसा गृहभेटी दरम्यान आरोग्य कर्मचारी लोकांना गोळ्या खावु घालण्यासाठी जात आहे पंरतु लाभार्थी हे रोजगार हमी योजना किंवा आपल्या कामा निमित्त घराबाहेर असल्याने रात्री पुन्हा गृहभेट करुन लोकांना गोळ्या खावु घालत आहे.
दि. 27 मार्च रोजी नागपुर विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. शाम निमगडे यांनी तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडिकोटा व वडेगाव ला भेटी देवुन हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिमेच्या होत असलेल्या कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पलास शहारे यांचे सह सर्व स्टॉप व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. निमगडे यांनी हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम सुक्ष्मकृती आराखडा नुसार प्रभावीपणे राबविणे, कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बॅंक, सोसायटी, अंगणवाडी, शासकिय कार्यालय, आश्रमशाळा, आरोग्य संस्थेत ई.ठिकाणी बुथाचे आयोजन करण्यात यावे, गृहभेटीच्या माध्यमातुन आरोग्य कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना वयोमानानुसार डि.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची मात्रा प्रत्यक्ष खावु घालण्यात यावे. आरोग्य पर्यवेक्षक यांचे मार्फत दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात यावे,एमडीए कार्यक्रमाची जनजागृती चांगल्या प्रकारे करण्यात यावी, अशा विविध बाबी अंमलबजावणी करण्याच्या सुचना यावेळी संबधिताना दिल्या.
यानंतर डॉ.निमगडे यांनी गावांमधील काही निवडक घरांना भेटी देवुन कुटुंबातील सदस्यांची  संवाद साधुन प्रत्यक्ष गोळ्या खाण्यात येतात कि नाही याची पडताळणी केली.तसेच त्या नंतर होणार्या त्रासाबाबत चर्चा केली,बोटाला लावण्यात येणारी मार्किंगची शहानिशी केली.
आपल्या भावी पिढिला हत्तीपाय या आजारापासुन वाचविण्यासाठी सर्व पात्र लोकांनी गोळ्यांचे सेवन करण्यात यावे.गोळ्या या सुरक्षित असून लोकांनी कुठलाही गैरसमज किंवा संकोच न बाळगता लोकांनी गोळ्या खाण्याचे आवाहन डॉ.वानखेडे यांनी याप्रसंगी लोकांना केले आहे.
भेटी दरम्यान त्यांचे सोबत हिवताप विभागाचे किशोर भालेराव, कोमल डोंगरे, आरोग्य सेवक अनमोल चव्हाण यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका ई. कर्मचारे उपस्थित होते.

एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही तेव्हा हत्तीरोग होऊ नयेम्हणून डी.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो. पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त करु शकतो.एक दिवशीय उपचार मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने व समाजात नविन रोगी होऊ नये याबाबत नागरीकांनी सहभाग द्यावा व गोळयांचे सेवन करावे.
                                   – डॉ.श्याम निमगडे , सहाय्यक संचालक, नागपुर